मी नागपूरकर किंवा नागपूर वासी असतांना माझी एक शिस्त होती. शनिवारी कचेरीतुन येतांनाच पेट्रोल भरून यायचं, म्हणजे पुढला आठवडा रांगेत थांबायला नको. सोमवार आणि गुरवार देवासाठी हार आणायचे. घरी मोठ्ठं देवघर होतं, त्यामुळे हार घातले कि पूजा संपन्न झाल्यासारखी वाटायची. घरची फुलं तर होतीच, पण हार महत्वाचे असायचेच. सण वारानुसार, ठराविक रंगांची फुले, पत्री, ई. पण हरवाल्याकडे मिळायचे हमखास. तो इतका मस्त ओळखीचा झाला होता कि त्याला पण माझी रोजनिशी पाठ झाली होती.
आता माझ्या ह्या घरी पण खूप देव आहेत, मुर्त्या आहेत, फोटो आहेत. त्यांना मस्त स्वच्छ साफ करून, देवघर साफ करून हार घातले, फुलं वाहिली, त्यांचे आसन बदलले कि दृष्ट लागण्यासारखे देखणे दिसतात ते सर्व मला. बघत बसावसं वाटतं, खास करून तेव्हा जेव्हा मोगरा किंवा निशिगंधा विराजमान होतो. क्या बात है. जमेल तशी त्यांची जागा पण मी बदलते, म्हणजे अजून चार चांद लागतात. आज पण अगदी तसेच झाले. त्यांचे आसन बदलले मी. खास माझ्या मैत्रिणींनी जी माझी टेलर आहे तिने शिवून दिले होते मला. खूप विविध प्रकार आहेत. आज म्हटलं ते अंथरावे. का कुणास ठाऊक पण कण भर जास्त गोड दिसू लागले देवघर आज. थोडासा विचार केला तर लक्षात आले कारण. ते असे: मी नागपूरला सिम्बिओसिस च्या एका कॉलेज ची सुरवात करण्या करता गेले होते. तिथल्या वास्तव्यात खूप जणांची ओळख झाली. एक खास अगदी जवळची मैत्रीण देखील लाभली त्या थोडक्या दिवसात हो. परत येते वेळी तिने मला जगातली भारी साडी प्रेमळ भेट आणि आठवण म्हणून दिली. ती माहेरची साडी माझ्या साठी काय आणि कित्ती महत्वाची आहे ह्याची कोणालाच माहिती नसणार आणि कळणार पण नाही. त्यात एक मस्त ब्लाऊज पीस होतं खरं त्या साडीला शोभेसं पण ती साडी आणि तो पीस खूप मोठा होता माझ्यासाठी. त्यामुळे मग टेलर नि तो मला परत केला मस्त झकास शिवून. आज मी तो अंथरला देवघरात आणि म्हणून शोभा प्रचंड वाढली त्या जागेची. एक वेगळी ऊर्जा निर्माण झाल्यासारखं वाटलं मला. आणि ह्याच सगळं श्रेय माझ्या सखीला, नंदिनीला. काय मस्त साडी पसंत केली आहे, झकास रंग, शाही बाज, उठून दिसणारे त्यावरचे नक्षीकाम... अहाहा च. जणू काही ती फक्त माझ्याच साठी तय्यार केली होती विणकाम करणाऱ्याने, सगळ्या कारागिरांने. "काय वर्णू तव गूण, अल्पमती नारायण", अशी अवस्था झाली आहे माझी. "डोळ्यांचे पारणे फिटले" ह्या म्हणीचा अर्थ समजला मला अजून एकदा आज, आणि असा अर्थ मला माझ्या राहत्या घरी उमगेल हे माहित नव्हतं. असा हा माहेरचा महिमा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा