शुक्रवार, १८ ऑक्टोबर, २०२४

२०६२: पानकळी


माझ्या अगदी न कळत्या वयापासूनच मला वैविध्य झाडांनी वेढले आहे. मी काही वर्षांची होते तेव्हा आमच्या घराच्या चारही बाजूंनी फारच मोठी बाग होती, किलोने वैविध्य फुलं, फळं, भाज्या उगवत होत्या, सातत्याने. एक तर जमीन फारच सुपीक होती, शेतीची होती आणि ती बाग सांभाळणारे अतिशय उत्कृष्ट लोक होते. शिवाय त्या काळी हवा, पाऊस, पाणी, जमीन, वातावरण, प्रदूषण ई. सगळेच प्रचंड साथ द्यायचे त्यामुळे पण उत्स्फूर्त बहर यायचा सतत. 


त्या नंतर माझ्या शाळेच्या दिवसात खूप प्रकारचे गुलाब आणि पत्रावळीच्या आकाराचे मनी प्लॅन्ट सर्वत्र होते. मग चाफा, लाल पेरू, कलिंगड, पोपटाच्या शेंगा, आणि बरीच शोभेची झाडं अंगणाची शोभा वाढवत होते. शोभेच्या झाडांचे वैशिष्ट्य म्हणजे रंगबिरंगी पाने, किंवा नुसतीच पाने, कधीतरी वेगळ्या पद्धतीची फुले पण ती देवाला वाहता यायची नाहीत, का? ते माहित नाही. पण असे काहीसे मी बघत होते आणि त्यांची नियमित काळजी पण घेत होते. 


इतक्या प्रकारची झाडे बघितली, पण परवाच दोन वेगळ्या धाटणीतली झाडे माझ्या संपर्कात आली. अर्थात मी काही ठिकाणी गेले होते गेस्ट म्हणून तेथे सत्कार करते वेळी मला ती झाडे कुंडीसहित दिली गेली. प्रेमाने दिलेली भेट म्हटल्यावर मी त्याचे संगोपन करत आहेच, आणि सध्या ती माझ्या घराच्या गच्चीत स्थानापन्न आहेत. माझ्या चार डोळ्यांना एवढ्यात आढळलं कि काही कळ्या आल्या आहेत त्या झाडांना आणि ती उंच पण झाली आहेत, किंबहुना डेरेदार पण. आणि ती दोन्ही झाडे अर्थातच शोभेची आहेत. मला असं दिसलं कि त्यांना कळ्या आल्या आहेत, खूप सुंदर दिसणाऱ्या कळ्या. बरेच दिवस झाले फुलं आली नाहीत म्हणून मला आश्चर्य वाटलं. म्हटलं कळ्या धरल्या पण मग फुलं कुठे गेलीत? तेव्हा उमजलं कि त्या पानकळ्या आहेत. म्हणजे नवीन पानं जेव्हा येतात तेव्हा ती दिसायला अगदी कळ्यांसारखी दिसतात पण ती उगवली कि त्याची नवीन पानं होतात. हे माझ्या साठी संपूर्णपणे नवीन होतं, इतकं नवीन कि ज्याचं नाव ते? कारण आत्तापर्यंत मला हेच ठाऊक होतं कि फांदीला पाने येतात, आणि ते चक्र सतत चालूच राहतं. बुंधा, मग विविध मोठ्या आकाराच्या फांद्या, त्याला फुटलेल्या छोट्या फांद्या आणि मग पाने. इथे तसं काहीच दिसतं नाही आहे. अगदी जसे कि पानांचे झाड. काय गम्मत आहे नाही?, कोणी हे संशोधन केलं कुणास ठाऊक? छोटेखानी गच्चीची अप्रतिम शोभा वाढवण्याचा मस्त उपाय आहे हा. क्या बात है? मज्जा आली ते अनोख्या पद्धतीने बहरलेले झाड बघायला.  किंवा त्याला बहरतांना साक्षी होतांना. बहरण महत्वाचे नाही का? स्मितहास्य फुलले बघितल्यावर कि बास. असेच काहीसे झाले ह्या झाडांसोबत माझे. आणि त्यात प्रेमाने दिलेली भेट आहे, त्यामुळे एक वेगळीच ओढ होती, वाट बघत होते कि ते कसे मोठे होतात ते. सुबक सुंदर कुंडी, त्यात अनोख्या पद्धतीने वाढणारे ते झाड, त्याला, मला आणि माझी गच्ची ज्यांना ज्यांना दर्शनीय आहे त्या सर्वांना नेहेमी मस्त अनुभव देऊन जात आहे, सुंदर अश्या पद्धतीने. वेगळे समीकरण आहे.  सुगंध नाही, फुलं नाहीत, पण वेगळी ठसन नक्की आहे, उठून दिसतं आहे दोघे, अहाहा च. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...