बुधवार, १६ ऑक्टोबर, २०२४

२०६०: तो चपलेचा जोड


एवढ्यातच मी एका प्राध्यापकाच्या खोलीत गेले, मस्त मोठी केबिन आहे त्यांची. माझ्या चार डोळ्यांनी बरंच काही टिपलं आणि मला माझ्याच आठवणींच्या हिंदोळ्यात झुलता आलं पुन्हा एकदा. 


तर त्याच काय झालं कि मी जेव्हा नोकरी करत होते, तेव्हा मी ऑफिस च्या बसने जाणं - येणं करत होते. माझ्या घरापासून ते बस स्टॉप पर्यंत, आणि कचेरीतल्या बस स्टॉप पासून ते कॉलेज पर्यंत पण अंतर भरपूर होते चालायला. मी  बहुतांशी चपला वापरते आणि आम्ही शहरापासून खूप लांब जात असू त्यामुळे एक काळजी म्हणून किंवा सोय म्हणा मी एक जास्तीची चप्पल ठेवायचे माझ्या केबिन मधे. माझं केबिन झाडू पोछा करणाऱ्या मावशींपासून ते ज्यांना ज्यांना माझी हि सवय ठाऊक होती ते सगळे मला हसायचे. असो. त्यांचं त्यांच्या बरोबर. मी पण मग त्यांना हसण्यात साथ द्यायचे. मज्जा यायची. मग आली एक मोठी संधी आणि भव्य दिव्य असे काम, नॅक व्हिसिट. पहिल्यांदा दिज्जग येणार होते म्हणून जरा आव्हानात्मक वाटलं आम्हाला जरी आमची जय्यत तय्यारी होतीच, सर्वतोपरी तरी. ऑफिस च्या कामांचे वाढीव तास होते, खूप घाई गडबड होती आणि त्यात एका अतंत्य महत्वाच्या PA ची चप्पल तुटली कि, ऐन वेळेवर. मग? ताबडतोब तिचा फोन आला मला, कि तुमच्याकडे म्हणे एक जास्तीची चप्पल ठेवली असते, माझी चप्पल तुटली आहे, मी घालू का? मी अगदी अत्यानंदाने ती तिला देऊन टाकली नेहेमीकरता आणि दुसरी आणून ठेवली. मग मी एका क्षणात सगळीकडे अगदी मशहूर, प्रसिद्ध, फेमस झाले कि. क्या बात है? 


माझी एक मैत्रीण गेले अनेक दशकं स्कॉर्पिओ नावाचा हत्ती चालवते चप्पल न घालता. पण तिच्या त्या गाडीत दोन ते तीन जोड ठेवलेच असतात. 


तसेच अजून एक खूप गुणी आणि तरुण मैत्रीण आहे, तिला गाडी चालवतांना एक ठराविक बूट लागतात, त्यामुळे तिच्या गाडीत पण एक जोड पादत्राणांचा असतोच.  


असे मग अनेक उदाहरणं आठवत गेले. आणि खूप म्हणजे खूपच मज्जा आली कारण त्या सर्व दिवसांची आठवण झाली, ते दिवस / प्रसंग माझ्या डोळ्यांसमोर अक्षरशः जसे च्या तसे उभे ठाकले आणि उत्कृष्ट अश्या भूतकाळात रमता आले. आणि हे सगळं घडलं ते त्या प्राध्यापकांच्या केबिन मधे मी एक जास्तीचा चपलेचा जोड बघितला.  उगाच भोसकपणा नकोच म्हणून विचारत बसले नाही, हा जोड कशासाठी?, जास्तीचा आहे का?, नेहेमीच ठेवता का?, मी पण ठेवत होते ई.  पण ह्या चार ओळी लिहून मोकळी झाले. त्या प्राध्यापक एक तर खूप मोठ्या आहेत, मानाने, आदराने, वयाने, अनुभवाने ई. त्यामुळे त्यांना हे प्रश्न विचारणे योग्य नव्हतेच.  पण माझ्यासारखे विचार करणारे कोणी तरी दुसरे आहेत हे बघूनच माझा आनंद गगनात मावेना, त्यामुळे मी फक्त तो जोड बघून खुश झाले आणि हे शब्द उमटले गेले आपोआपच.  "कनेक्टिन्ग डॉट्स" असं म्हणतात ना, तसे तो जोड बघून माझे अनेक डॉट्स जोडले गेले, स्मितहास्य सहज उमटलं आणि अंतर्बाह्य समाधान लाभले, आनंद झाला, घडलेल्या कृती, युक्ती आणि गोष्टीचे कौतुक वाटलेच. म्हणजे बघा ना, हि चप्पल तुटण्याची घटना २०१५ ची आहे हो, तब्बल १० एक वर्षांपूर्वी ची. आणि त्याच्या गोड आठवणी अजूनही ताज्या आहेत किंबहुना त्या छोट्याश्या चपलेच्या जोडला पाहून ताज्या झाल्या हो.  आई शपथ. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...