हो हो अगदी योग्य वाचलंत तुम्ही. आज अचानक मला जाग आल्यासारखं झालं कि मी हे काय करते आहे? मी जेव्हा पूर्णवेळ शिक्षिका म्हणून काम करत होते त्या वेळेपासूनच मी अमृततुल्यची फार मोठी शौकीन झाले होते. फार नाही पण घोटभर चहा हवाच. आणि आता काय भरपूर वेळ आहे हातात, त्या मुळे शांततेत विविध प्रकारे चहा दोनदा दिवसातून घेतला जातोच. केक रस्क आहेत सध्या सोबतीला. मग काय आज कपातील चहा कधी संपला हे समजलंच नाही. आधीच कप छोटा, त्यात एवढासा चहा आणि त्यावर रस्क बुडवल्यावर सगळा चहा त्या पठ्याने च फस्त केला कि, मला काहीच उरला नाही. जसे कि मीच चहा खाल्ला पिला नाहीच. प्यायला काही उरलेच नाही. चहा पण खाता येतो हे आज नव्याने उमगले. मग काय संगणक हाताशी आहेच, म्हटलं जरा चाचपडून पाहावे कि चहा स्वाद चॉकलेट किंवा ट्रॉफी उपलब्ध आहे का? पण छे हो, नाही सापडलं काही प्रथमदर्शनी असे. चॉकलेट च्या स्वादाचा चहा आहे, पण ट्रॉफी नाही. चहा खायचा असेल तर मग हाच एक पर्याय सध्या उपलब्ध, गरमागरम चहा+रस्क. चहा पिण्याची मजा नसली तरी नव्याने समजलं कि चहा खाता पण येतो ते. दोन्ही करायचे असेल तर किटली जवळ घेऊन बसणे, आधी खा मग प्या. आता माझ्याकडे बराच वेळ असल्यामुळे हे सहज शक्य आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा