हवा…
आपण श्वास घेतो तीच
आणि त्यातच आपण सगळं सोडतोही.
धूळ, आवाज, प्रदूषण…
आता electrosmog सुद्धा.
पण अजून काहीतरी आहे
जे दिसत नाही
पण जाणवतं नक्कीच.
आपले शब्द.
आपले विचार.
कधी लक्ष दिलंय? आपण किती सहज कुणाबद्दल काहीही बोलतो, तक्रार करतो, मनातही किती नकारात्मक विचार फिरत असतात.
हे सगळं कुठे जातं?
याच हवेत…
ज्यात आपणच पुन्हा श्वास घेतो.
एक छोटासा प्रयोग करून पाहूया?
थोडं थांबूया कठोर बोलण्याआधी.
तक्रारी थोड्या कमी करूया.
मनातले नकारात्मक विचार हळूहळू सोडूया.
हवा कधीच तक्रार करत नाही…
ती फक्त देत राहते.
पण आपण?
आत्तापर्यंत जे काही नकळत पसरवलं असेल
त्यासाठी…
निसर्गाची मनापासून माफी मागूया.
आणि मग, थोडं हलकं होऊन, थोडं अधिक चांगलं जगायला सुरुवात करूया.
सुरुवात विचारांपासून होते.
विचार बदललेतर शब्द बदलतात.
आणि शब्द बदलले
तर वातावरणही बदलतं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा