मराठी वर्णमालेचे योग्य उच्चारण करण्याचे अनेक फायदे आहेत, हे आपण सर्वजण जाणतो. या संदर्भातील अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ YouTube वर उपलब्ध आहेत. अशाच एका व्हिडिओमध्ये संशोधकांनी ‘व्याधी’ म्हणजे नेमके काय, याचे सविस्तर स्पष्टीकरण केले आहे.
या अभ्यासानुसार, आपण दररोज म्हणत असलेल्या स्तोत्रांमध्ये सर्व स्वर, व्यंजन किंवा अक्षरे समाविष्ट होत नाहीत. प्रत्येक स्तोत्रातील अक्षरांची संख्या आणि आपण नियमित म्हणणाऱ्या स्तोत्रांचा अभ्यास केल्यानंतर हा निष्कर्ष समोर आला.
नावाजलेल्या वैद्यांच्या अनुभवानुसार, जर संपूर्ण वर्णमाला दररोज उच्चारली गेली, तर शरीरातील सुप्त किंवा कमी कार्यरत घटक पुन्हा सक्रिय होऊ शकतात. काही प्रयोगांमधूनही याची पुष्टी झाल्याचे सांगितले जाते.
ठराविक वेळेला, आवश्यकतेनुसार आणि योग्य ताला-सुरात जर साधी वर्णमाला मोठ्याने उच्चारली, तर माझ्या मते त्याचा फायदा फक्त त्या व्यक्तीलाच नाही, तर त्याच्या आसपासच्या सजीवांनाही प्राणी, पक्षी, झाडे, वेली यांनाही होऊ शकतो.
असं म्हणतात ना, "लव्ह इज इन एअर". तसंच काहीसं इथेही घडत असावं. जसं स्तोत्रांचे स्वर, ऊर्जा, भाव आणि भक्ती अनेकांपर्यंत पोहोचतात आणि त्यांना लाभदायक ठरतात, तसंच भावपूर्ण पद्धतीने उच्चारलेली वर्णमालाही सकारात्मक परिणाम घडवू शकते, उच्चारण करणाऱ्यावर आणि त्या ध्वनीलहरी ज्या ज्या पर्यंत पोहोचतील त्यांच्यावरही.
म्हणूनच, केवळ स्वतःचा आजार बरा करण्यासाठी नव्हे, तर इतरांसाठी, समाजासाठी आणि व्यापक कल्याणासाठीही हे उच्चारण दररोज करूया. जे निरोगी आहेत, त्यांच्यासाठी हा एक प्रतिबंधात्मक उपाय ठरू शकतो.
यातून पुन्हा एकदा शाळेत परत गेल्याचा आनंदही अनुभवता येईल. किंवा कोणतीही अपेक्षा न ठेवता, फक्त काही मिनिटे सहजपणे दिवसातून काढून हे करता येऊ शकते.
समाजाकडून मिळालेलं परत देणं हीदेखील आपलीच जबाबदारी आहे, कधीतरी कुणाच्या प्रार्थना, कुणाच्या सकारात्मक स्पंदनांनी आपल्याला नकळत उभं केलं आहे; आता त्या हवेत पुन्हा तेच चांगुलपण भरून देण्याची वेळ आपली आहे. कारण शेवटी, देणं आणि घेणं हाच जीवनाचा समतोल आहे.
चला तर मग, स्तोत्रपठण नित्यनेमाने सुरू ठेवूच, आणि त्यासोबत काही मिनिटे ठराविक पद्धतीने वर्णमाला उच्चारणालाही आपल्या दिनचर्येचा भाग बनवूया.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा