आज अचानक माझ्या समोर एक मुलाखत आली आणि ती ऐकून मी अक्षरशः थक्क झाले. त्या मुलाखतीत एका व्हीलचेअरवर असलेल्या मुलीची कथा मांडली होती, जी आज प्रगतीच्या शिखरावर पोहोचली आहे. शारीरिक मर्यादा असूनही तिने जिद्दीने स्वतःचं एक साम्राज्य उभं केलं आहे.
मला ही मुलाखत पुन्हा एकदा, कदाचित दोनदा पाहावीशी वाटते, जेणेकरून तिच्या कार्याचा पूर्ण आवाका आणि गाभा अधिक चांगल्या प्रकारे समजेल.
तिची आई जगातील सर्वात श्रीमंत स्त्रियांपैकी एक आहे. तिचे आजोबा देखील मोठे उद्योगपती आणि धनाढ्य होते. हे सगळं पाहताना मनात एक प्रश्न येतो. इतकी संपत्ती, सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा, जगातील नामांकित तज्ज्ञांपर्यंत सहज पोहोच, लागतील तेवढे पैसे खर्च करण्याची ताकद, तरीही काही गोष्टी आपल्या हातात का नसतात?
अशी अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात जिथे सत्ता, संपत्ती, बुद्धिमत्ता आणि वैभव सर्व काही असतं, पण तरीही काही उणिवा कायम राहतात.
याचं उत्तर एकच आहे. सगळं त्याच्या हातात आहे. तोच सर्व काही ठरवतो, तोच चालवतो. माणूस फक्त एक माध्यम आहे. या जगात येणं, जाणं आणि मध्ये घडणारं प्रत्येक क्षण त्याच्याच नियोजनाचा भाग आहे. आपण फक्त त्या स्क्रिप्टमधील एक भूमिका निभावतो, इतकंच.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा