रविवार, ३० मे, २०२१

चिरतरुण आजोबा...

आमच्या अगदी शेजारी एक कुटुंब राहत. त्यांनी ज्यावेळी घर घेतलं त्यावेळेपासूनच ते सांगतात त्याच्या वडिलांबद्दल किंबहुना वडिलांचच्या प्रकृती स्वास्थ्या बद्दल. त्यानंतर आमचे शेजारी वर्षा करता परदेशी गेले होते. परत येण्याचं कारणही बाबांची तब्येतच होती. असो. एकदाचे नेहेमीकरता जेव्हा आमचे शेजारी परत आले तेव्हा त्याचं घर नीटनेटकं लावून देण्याकरता त्यांचे आई बाबा आले नागपूरहून. तसे दिसायला कृश वाटत होते दुरून, पण हळू हळू त्यांच्या रॊजची कामे बघून अवाकच झाले मी. दोनचाकी वर काकूंना घेऊन दररोज ताजी भाजी आणणे, नातवाला हाताला धरून संध्याकाळी फिरवून आणणे . मग माझी छानच ओळख झाली, गप्पा होत होत्या. एक दिवशी मी त्यांच्या कडे संध्याकाळी गप्पा मारायला गेले तर त्यांचा मुलगा आणि अजून दोन माणसं भली मोठी चारचाकी घेऊन धडपड करत होती. नवीन गाडी घेण्याचं चाललं होत, ती कशी बसते घर पुढे हे बघणं चाललं होत. बराच वेळ उलटी सरळ वगैरे पद्धतीने लावून बघणं चाललं होत. त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी ती भली मोठी चारचाकी विकत घेतलीच आणि खूप दिवस पार्क करण्यासाठी गडबड चालायचीच होती त्यांची. एक दिवशी मी अवाक झाले, रविवार होता आणि शेजारच्यांनी तीच गाडी कोणी तरी एका झटक्यात पार्क केली देखील. नीट बघितलं तर ते आजोबा होते. देवा इतक्या शिताफीने त्यांनी गाडी हाताळली कि ज्याचं नाव ते, अहाहा. काय उत्साह होता आणि आहे त्या काकांमध्ये, जबरदस्तच. मानलं बुवा त्यांना.

प्राणिशास्त्र...

 ह्या वर्षी माझ्या मुलांना प्राणिशास्त्र हा विषय आहे. माझं तस शिक्षण सेमी इंग्लिश = मराठी + इंग्रजी माध्यमातून झालं असल्यामुळे मला प्रत्येक गोष्टीचे इंग्रजी मधील नाव माहित नाही, अजिबातच. किंबहुना घरी मराठमोळं वातावरण असल्यामुळे, शेजारी, शिक्षक, मित्र मैत्रिणी मराठीतच बोलत असल्यामुळे हि कदाचित उपयोगापेक्षा जास्त इंग्लिश भाषेला कधी महत्व दिले गेले नाही आणि आचरणात आणले नाही. आता प्रत्येक दिवशी ढीगभर नवीन नवीन इंग्लिश मधले शब्द शिकून येतो वेद आणि माझी परीक्षाच असते, कारण पहिल्या दिवशी तो सांगतो कि ह्याचं इंग्लिश नाव हे आहे बर का. दुसऱ्याच दिवशी स्वारी हजर कि मी काल काय सांगितलं होतं? असं कसं तू लक्षात ठेवत नाहीस? वगैरे.

कालचा शब्द होता "चिलटं" ह्या मराठी नावाच्या उडणाऱ्या जीवाला काय म्हणतात? हे राम. आणि त्याला म्हणतात Drosphilla=Scientific name, Fruit-flies=English name, हाश्श, जीभ वळायला जरा वेळच लागला. आज काय सांगतोय कोणास ठाऊक?

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...