बुधवार, १३ जुलै, २०२२

शिकण्यासारखे काही

आपण सर्व मनुष्य प्राणी रस्त्याचा वापर करतो ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आणि अर्थातच कामानिमित्यच. प्रत्येकाला रस्ता वापरण्याची मुभा आहे आणि हक्क पण, तेथे कोणीही लहान-थोर, गोर-गरीब, कुठलाही भेदभाव नसतोच, नसायला हवा. प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी लहान असतो, गाडी शिकण्याच्या अवस्थेतून गेला असतो, पायी चालला असतो, संघर्ष केला असतो. कोणीही कधीही वरून टपकलेला मी तरी बघितला नाही.

आधी माझा असा विश्वास होता कि जेवढी मोठी गाडी, जेवढं वय जास्त, जितका अनुभव दांडगा तेवढा तो व्यक्ती जमिनीवर जास्त स्थिर असतो, वावरतो आणि कृतीतून दिसतं. 

पावसाळा सुरु झाला तेव्हा पासून एक ध्यान्यात येतंय कि गाड्यांचे आकार आणि किमती जितक्या जास्त म्हणजे विकत घेण्याची क्षमता जास्त तेवढा मिजास आभाळा एवढा, तितकीच जास्त घाई, तितकीच माणसांची कमी झालेली किंमत, तितकीच वाढलेली अपेक्षा, भलता गर्व आणि राजाचा आवेश, राजेशाही कधीची संपली तरी देखील. रस्ता हा फक्त आपला, बाकीचे एक तर अस्तित्वात नाहीत किंवा फक्त किडे माकोडे इतकेच. इतक्या आवेशात हाणायची गाडी, इतक्या वेगात कि आजूबाजूच्यांच्या अंगावर रस्त्यावरचं पावसाचं राड चिखल युक्त पाणी उडायलाच पाहिजे नखशिकांत. काय हे? काय हि असुरी वृत्ती? आणि काय मिळतं असं वागून?. मानलं कि त्या चालकाला घाई आहे, मग ऋतुमानाप्रमाणे जरा १० मिनिटे लवकर बाहेर पडावं आणि सावकाश गाडी चालवावी. हे विसरून कसं चालेल कि ज्या गाडीत तुम्ही कोरडे बसला आहात तशी कोरडी राहण्याची गरज दुसऱ्यांना देखील आहे. दिवसभर ओलं बसून किंवा ओल्या अवस्थेत कामं करणं अतिशय अवघड आणि तब्बेतीला हानीकारक आहे. तुम्ही उशीरा निघालात म्हणून बाकिच्यांना शिक्षा का? पावसाळ्यात कधी कधी ब्रेक नीट लागत नाहीत, पाण्यात तेल पडलं असेल तर घसरडं होतं, जोरात खड्यातून गाडी गेली तर नकळत चालकाच्या मणक्याला, मानेला मार / धक्का बसू शकतो, गाडीत पाणी जाऊन बंद पडण्याची शक्यता असते क्वचित, मग निघा कि थोडसं लवकर, करा कि दुसऱ्याचा विचार देखील, कारण रस्ता पण आपल्या मालकीचा नाही, गाडी तर नाहीच नाही आणि आपला श्वास देखील, सगळं "त्याने" भाडे तत्वावर दिलेले आहे, ते उत्कृष्ट पणे सांभाळा सातत्याने, बास.

सुगीचे दिवस

मी शाळेत असे पर्यंत काहीही म्हणा पण कडक शिस्त घरी आणि शाळेत, अडनेड वय, जगाच्या थोडसं मागेच ई. त्यामुळे सरळ साधी राहणी माहिती होती. अर्थात आत्तासुद्धा तशीच आहे पण महाविद्यालयात गेल्यावर रंगबिरंगी कपडे, फॅशन, तुलना, थोडीशी / किंचितशी आलेली प्रगल्भता ई. मुळे बदल सहज झाले. मग डिग्री कॉलेज आणि त्यानंतर नोकरी ह्या चढत्या क्रमाने फॅशन मधे देखील तसेच चढते बदल झाले, थोडीशी रंगरंगोटी सामील झाली, म्हणजे मॅचिंग, मोठ्या आकाराच्या - प्रकारच्या टिकल्या स्थानापन्न झाल्या कपाळावर, नख पॉलिश पण उत्साहाने लावलं गेलं थोड्या प्रमाणात पण प्रत्येक ड्रेस ला शोभेल असं, मर्यादेत राहून. काही वर्षांनी आडनाव बदललं, दोन नवीन पाहुणे देखील आले आणि मग काय माझी मी संपूर्णपणे हरवले,कुठेतरी विलीन झाले असंच वाटलं मला. आत्ता तब्बल २२-२३ वर्षांनी जाग आली आहे मला आणि "पुनःश्य हरीओम" अशी फेज आली आहे आणि ती मी मनःपूर्वक मस्त एम्जॉय करते आहे. पुन्हा एकदा रंगरंगोटी सुरु झाली आहे जी कधी होईल असं स्वप्नात देखील वाटलंच नव्हतं मला. एक प्रकराची स्थिरता आली होती, नैराश्य मुळीच नाही, पण विस्मृतीत गेल्या होत्या त्या सर्व गोष्टी. आता त्यावेळी होती अगदी तशीच शांतात, उत्साह पुन्हा अनुभवत आहे मी. मलाच मी गवसले, असं म्हणायला अजिबात हरकत नाही. कदाचित मधल्या वेळात माझ्या जबाबदाऱ्या पार पाडण्याकरिता मी झोकून दिले आणि आता पुन्हा गाडी रुळावर यायचा प्रयत्न करत होती तिला मी हातभार लावला. महद आश्चर्य म्हणजे वेळ काढला कि मिळतो हे देखील नव्याने समजलं मला. अजून एक फारच भन्नाट आश्चर्य म्हणजे मी अगदी प्रत्येकासारखं दोन्ही हातांच्या बोटांची नखं एकाच वेळी कापते, गेली अनेक वर्ष. पण ह्या वेळी मी फक्त माझ्या उजव्या बोटांची नखं कापली, डाव्याची नाही कारण:

१) ती एक तर वाढलीच नाहीत, किंवा हळुवार पणे वाढत आहेत

२) त्यावर मी अप्रतिम रंग चढवले आहेत

माझी नखं पण मला नकळत साथ देत आहेत, आत्ता, ह्या स्टेज ला, शब्द न उच्चारता देखील म्हणतात कसे "हो पुढे आणि कर फुल्टू एन्जॉय हे देखील दिवस". त्या नखांना माझ्या मनातलं कसं काय उमगलं कोणास ठाऊक? नखं पण अशी अफलातून साथ देतात हे मी पहिल्यांदाच अनुभवते आहे. कित्ती पिटुकली पण वाखाणण्यासारखी गोष्ट आहे ना? 

अश्याच आपल्यासोबत घडत असलेल्या चिमुकल्या गोष्टी टिपा आणि प्रत्येक क्षणाचं जमेल तेवढं सोनं कराच.  

सहकुटुंब ट्रीटमेंट

"खिचडी" ह्या सदरात काल मी लिहिल्याप्रमाणे गेले तीन एक दिवस माझं पोट माझ्यावर विनाकारण नाराज होतं, असो कधी कधी त्याचे पण दिवस असायला पाहिजेतच ना. काल सरतेशेवटी मी डॉक्टर गाठलाच, पर्याय नव्हता म्हणून. माझ्या डॉक्टर घरूनच त्यांचा दवाखाना चालवतात. त्यामुळे त्यांना मी आधी कळवून गेले, फक्त खुर्चीवर टेकले नाहीतर वाफाळलेला चहा माझ्या हातात आला आणि एक गोड धमकी पण त्या सोबत "कि मी विचारत नाही आहे, देतो आहे चहा आणि तो प्यायचाच, पाऊस पडतो आहे बाहेर, तू ऑफिस मधून आली आहेस थेट त्यामुळे चुपचाप घ्यायचा हा चहा आधी", इति काका. डोळ्याच्या कडा आपोआपच ओल्या झाल्या, नकळत. म्हणजे बघा कसे भन्नाट औषध मिळतं मला नेहेमीच त्यांच्याकडे गेल्यावर. फक्त डॉक्टर काकू नाही तर सहकुटुंब इलाज करतं दरवेळी, न चुकता, गेले अनेक वर्ष. हि मी घटना संध्याकाळी माझ्या अजून एका मैत्रिणीला ऐकवली तर म्हणते कशी ह्या नक्कीच होमिओप्याथी किंवा आयुर्वेदाच्या डॉक्टर असतील, ऍलोपॅथी वाले नक्कीच नाही. हे त्यांना कसं समजलं माहित नाही आणि हो ते खरं देखील आहेच. कारण माझ्या ह्या होमिओ प्याथीच्याच डॉक्टर आहेत. जशी होमिओप्याथी शारीरिक आणि मानसिक स्थरावर काम करते तसेच मग ते डॉक्टर पण आपोआप घडतात का? हे त्यांचं वैशिठ्य आहे कि काय कोणास ठाऊक. दारी आलेला आजारी व्यक्ती पट्टकिनी बरा होणं महत्वाचं आहे सर्वार्थाने. मला हे असं सगळं माझ्या लेकाच्या दवाखान्यात सुरु करायचं आहे जेव्हा त्याची प्रॅक्टिस सुरु होईल काही वर्षांनी. माझ्या लेकाला तो डॉक्टर झाल्यावर आणि बाकी इतर समस्त डॉक्टर मंडळींना, आणि नर्स, वॉर्ड बॉय ई. सदबुद्धी मिळो आणि त्यांनी देखील सगळ्या पेशंट्स ना उत्तम सेवा प्रदान करो नेहेमीच हिच ईशचरणी प्रार्थना.   "माणसाने माणसाशी माणसा सम वागणे". ह्या नाहीतर त्या स्वरूपात "तो" नेहेमीच देतो मला भरभरून, सातत्याने, कुठेही कणभरही कमी न पडू देता. त्यामुळे एखाद्याच व्यक्तीकडून अपेक्षा करणे सपशेल चुकीचे आहे, वेळ फार दवडतो ह्याच्यात एक तर अपेक्षा करण्यात आणि भंग झाल्यावर त्यात पुन्हा. त्यामुळे फक्त चांगले / उत्तम कामं करत राहा, पेरत राहा, फळं आपोआप आणि निश्चित मिळणारच.


Guru-Shiksha

To my beloved V n V,

1)  My mom too mentioned the same thing which Shri Sadguruji mentioned below. My mom narrated that the moment you deliver baby your learning starts / begins. Its essential to enjoy those new vibrant tutelage to your best.

  

1)   One of my most beloved Nephew Mangesh always used to mention that why always use “Ved and Varnika”, why not “Varnika and Ved” when you refer to your kiddos? And that was the eye opener for me, of course with due respect, both are mine. But then as my nature is I went ahead a few steps further and found the ultimate solution in the form a new term VnV. That’s it. Wow, not only me but few of my friends who are also blessed with twins or two kids with names starting from same alphabet are also way more than happy for this hatke nomenclature. Agreed with mom once again, kids taught me a lot. And yes

2)  I am truly blessed to have many more kids than VnV, my students. They keep me on toes and I learn incrementally from them always. So much to learn from everyone of them.

3)  VnV continued their lessons for 19 long years now, even today and including pronunciations, dress code, color, multiple food options, music, friends, family, extended family etc. to name a few. The list is really endless. Wow, I am enjoying it thoroughly.

Thanks to one and all for being there for me VnV. Always. Wishes of Gurupournima. Who said only elders teach you or show you the correct path? And also where it is mentioned that we only learn from living things or human beings? Learning is and should be from everyone, always and incrementally.

 

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...