शुक्रवार, १२ मार्च, २०२१

घरीच केलेलं ....

जस मी आधीही अनेक "अनुकथेत" लिहिल्याप्रमाणे माझे बाबा म्हणजे एक चालतं बोलतं विद्यापीठच होत माझ्या साठी. त्यांच्या विषयातील सखोल तांत्रिक माहितीशिवाय त्यांचं इंग्लिश, मराठी, संस्कृत भाषेवर पण प्रभुत्व होत आणि ते त्यांच्या सहज बोली भाषेतून प्रकर्षाने जाणवायचं, नेहेमीच. त्यातील एक प्रसंग मला सहज काल आठवला, म्हटलं लिहावं. 
 
तर त्याच असं झालं, माझ्या एका खास मैत्रिणीने परवा मला अप्रतिम, अतिशय चविष्ट असा पास्ता डब्ब्यात दिला आणि त्यामुळे त्यादिवशीचं ऑफिस मधलं जेवण एकदमच भन्नाट झालं, मज्जा आली. मग तो डब्बा परत देण्यासाठी काही मुहूर्त लागत नव्हता,पण मग महाशिवरात्रीच्या निमित्याने गोड म्हणून केशरयुक्त श्रीखंड सगळ्यांना घास-घास येईल असं दिल मी तिच्या डब्ब्यात दिल. त्या दोघी- तिघी जणी मिळून डब्बा एन्जॉय करतात. एकीने वा / WA = WhatsApp वर निरोप दिला श्रीखंड छान झाल्याचा आणि दुसरीने बस मधे सांगितलं झक्कास झाल्याचं. आणि त्यानंतर अगदी सहज विचारलेला प्रश्न "घरी केलं होत?" (ह्या माझ्या मैत्रिणीला प्रश्न विचारायला प्रचंड आवडत नेहेमीच, किंबहुना तिच्या प्रश्नाची सरबत्ती आम्ही नेहेमीच एन्जॉय करतो) असो. त्यामुळे मला ताबडतोब माझ्या बाबांची आठवण आली. 
 
माझ्या लहानपणी घरी फोन हि संकल्पना देखील नव्हती, त्यामुळे "असे पाहुणे येति आणि स्मृती ठेवुनी जाती", सहज अचानक पाहुणे येत असत आणि मग काय "अलिखित नियम जसा" तसे जेवूनच जातं सगळे. तेव्हा मग आईचा इशारा समजून किंवा घरीच जर काही हलवाया कडले काही गोड पदार्थ आणले असतील तर ते वाढले जायचे पानात. मग नेहेमीचाच सहज विचारलेला प्रश्न असायचा पाहुण्यांचा "घरी केलं हे सगळं?" त्यावर माझे बाबा उत्तर द्यायचे "हो$$$". पाहुणे चकित. काय सुगरण बायको आहे, फारच लकी वगैरे.... त्यांच्या चेहेऱ्यावरील प्रश्न चिन्ह बघून बाबा म्हणायचे कसे "घरीच केलंय सगळं पण.... मिठाई वाल्याच्या". अस्सा हशा पिकायचा म्हणून सांगते, अहाहा. अजूनही सगळं आता होतंय अस्स प्रत्यक्ष डोळ्या समोर उभं ठाकलंय सगळं. 
 
थँक्स माझ्या त्या मैत्रिणीला आणि तिच्या प्रश्नाला, चिकित्सक वृत्तीला देखील. असेच प्रश्न विचारात राहा म्हणजे मला असंच काही-बाही आठवत राहील आणि मी लिहीत राहीन.

Locate me at FB: https://www.facebook.com/preeti.mulay for more such stories.

Listen to this story on: https://youtu.be/aQDrUWS1Gkk



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...