माझी एक बहीण आणि सहपाठी ह्यांचं जेव्हा नवीन लग्न झालं तेव्हा माझ्या लक्षात आलेली एक गोष्ट इथे देत / मांडत आहे.
माझ्या बहिणीचं जेव्हा लग्न झालं तेव्हा मी साधारणतः १०-१२ दिवस आधी मावशी कडे जाऊन पोचले होते, सहज, मदत किंवा असावं कोणीतरी घरी म्हणून. त्यावेळी मला बघितलेलं आठवतंय, माझी बहीण जेव्हा तिची बॅग पॅक करत होती, लग्नाच्या काही दिवस आधी त्यावेळी काही साधे, काही महागडे ड्रेसेस, आणि बरेच तिचे कपडे घेऊन जात होती. सहज विचारलं तर म्हणाली, "नवीन घरी गेल्या गेल्या नवीन ठिकाणी टेलर शोधणं, कपडे विकत घेणं वगैरे होणार नाही, आणि आईकडे पण पट्टाकिनी परत येणं होणार नाही त्यामुळे आईनेच हा स्टॉक घेऊन दिला आहे, सोय म्हणून".
माझी एक सहपाठी कोरेकरकारीत वैविध्य ड्रेस अचानक घालून यायला लागली, तेव्हा समजलं कि तिचं नुकतच लग्न झालंय म्हणे. मग मी तिचं अभिनंदन करायला गेले आणि सहज विचारलं त्या नवीन ड्रेसेस बद्दल, तर योगायोगाने ती तेच म्हणाली आईने मागे लागून शिवून घेतले आणि पाठवले.
इथे जी मी माझी बहिण म्हटलं ना तिच्या मुलीचं लग्न आहे पुढील वर्षी, इतकी जुनी गोष्ट आहे हि आणि सहपाठीच लग्न झालाय आत्ता, महिन्यापूर्वी.
ह्या दोन्ही प्रसंगाचं माझ्या मनात न कळत जे मॅपिंग झालं, त्यामुळे मला दोन प्रश्न पडलेत,
1. मुलीच्या आईनेच फक्त हा विचार करायचा असतो का?
अजुनही?
इतक्या वर्षांनी देखील?
का ज्या घरात ती राहायला जाणार असते त्यांनी देखील अजून जास्त विचार करायला हवा?
मी फक्त येथे कपड्याबद्दल बोलत नाही आहे, सर्वच वस्तूंबद्दल म्हणते आहे.
अर्थात आजकाल मुली आणि सासवा दोघीही बदललेल्या दिसताहेत, हे चांगलं चिन्ह आहे.
2. आणि दुसरा प्रश्न म्हणजे माझी मनापासून हि इच्छा आणि प्रार्थना आहे कि हे सगळे नवीन ड्रेसेस, चपला, मोबाइल, पर्स आणि बरेच सगळे फक्त "नव्याची नवलाई नऊ दिवस" न राहता टिकून राहावी, त्या नवीन मुलीला सगळ्यांचेच उत्साहाने साह्य मिळावे म्हणजे मिळवलं.
Sunder
उत्तर द्याहटवा