गुरुवार, १८ मार्च, २०२१

शबरीची बोरं (आधुनिक)

गेली अनेक पिढ्या शबरीच्या बोरांबद्दल सगळेच बोलत आहेत, ऐकत आहेत आणि आत्मसात देखील करत आहेत, अनेक प्रकारे, नेहेमीच.
माझ्या आईकडे घरी कुठलाही पदार्थ केला तरी तो आधी देवासमोर ठेवला जायचा, अगदी उदाहरणार्थ सकाळचे पोहे देखील. त्यामुळे स्वयंपाक करणाऱ्याला आणि खाणाऱ्याला ती गोष्ट माहित होती, आणि त्यामुळे जर यदा कदाचित मीठ कमी झालंच तर वरून लावून घेतलं जायचं. तिखट कमी झालं तर वैविध्य चटण्या / लोणची असायचीच सोबतीला.
 
अश्या अनेक वर्षांच्या सवयीनंतर जेव्हा मी सासरी आले तेव्हा थो$$$$$डी पद्धत वेगळी वाटली. सगळेच पदार्थ करता करता अनेक स्टेजेस मधे चाखले जायचे, सासूबाईंना देखील चव दिली जायची आणि त्या नंतर त्यात सुधारणा व्हायची.
 
जेव्हा जेव्हा आमचे बाबा (Father in law) असतात पुण्यात वास्तव्याला त्यांना पूजे दरम्यान दररोज कॉफी लागतेच. "ह्यांनी" जर कॉफी करून दिली आमच्या बाबांना तर मी "ह्यांची" एक सवय लक्ष देऊन बघितली आहे आणि "हे" पण मग स्वतः घेतातच कॉफी बाबांबरोबर. आई शपथ, आधी स्वतः एक-दोन घोट पिऊन बघतात आणि मगच बाबाना देतात कॉफी. 
 
अहाहा. माझ्या दृष्टीने कौतुक करावं तेवढं कमीच आहे "ह्यांचं", आधुनिक शबरीची बोरं जणू, नाही का?
 
To read more writeups by me, I am on facebook at www.facebook.com/preeti.mulay

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...