गुरुवार, १८ मार्च, २०२१

डोकं खराब...

 

माझं का?

ते नेहेमीचेच आहे, 
 
पण आज मी एका कधीही किंवा कधी कधी डोकं खराब होणाऱ्या बद्दल सुतवाच्य करणार आहे. 
 
गेले दोन तीन दिवस झाले मी बघते आहे कि व्यवस्थित लाईट आहेत, गरम होण्याची प्रक्रिया देखील होत आहे, पाणी शिंपडणं पण करून बघितलं, वेळ दिला, आणि फक्त साधा कॉटन चा च कपडा बरं का, पण छे, ढिम्म / शून्य प्रतिसाद. साध्या साध्या सुरकुत्या पण जर झेलू शकत नाही म्हटल्यावर मी शिक्का मोर्तब केला कि डोकंच खराब झालाय, नक्कीच. बाकी का$$$$हि नाही. त्यामुळे मग आज फक्त असं वाटायला नको कि मी झोपेतून उठून आले, सुरकुत्या झाकण्याचा प्रयत्न केला छोटेखानी जॅकेट घालून, बाकी काही पर्याय सुचलाच नाही मला. असो. 
 
येस, बरोबर ओळखलंत मंडळी, मी माझ्या दररोजच्या सखींच्याच डोक्या बद्दल बोलते आहे, इस्त्री हो, अजून कोण.
 
All previous stories on facebook on my account: www.facebook.com/preeti.mulay

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

२४६४: तळ गाठणे

आमच्या सोसायटीत चार बोरवेल आहेत. त्यापैकी दोन चालत नाहीत, एक चालू आहे, आणि चौथ्याबद्दल मला फारशी माहिती नाही. त्या बोरवेल खोदताना मोठमोठ्या ...