आज एका हत्तीचा फोटो आला आहे इंग्लिश वर्तमानपत्रात आणि त्यात त्या गोंडस हत्तीला लागलंय, पायाला पट्टी बांधली आहे आणि तो स्पेशल हत्तीच्या दवाखान्यातून बाहेर पडतो आहे. तो फोटो बघून काही गोष्टी आठवल्या, माझे माझ्या मुलांबरोबर झालेले संवाद आठवले आणि म्हटलं लिहावं.
माझ्या मुलांची एक वर्ग मैत्रीण आहे तिला "पशुवैद्य/जनावरांचं डॉक्टर" व्हायचं आहे, जे माझ्या दृष्टीने एक आव्हान आहे. कारणं बरीच आहेत. माणसांचं डॉक्टर होणं देखील आव्हानात्मक असतं कारण ढगाएवढा अभ्यास असतो आणि प्रत्येक येणाऱ्या पेशंट बरोबर नव्याने कदाचित शिकावं लागत, पण माणसं सांगू तरी शकतात काय झालाय ते आणि डॉक्टर स्वतः माणूसच असल्यामुळे त्याला सगळं समजत पण. माणसाच्या डोक्यात आणि शरीरात काय काय होतंय ह्याचा ठोकताळा बांधणं जमू शकत एक वेळेस पण ह्या मुक्या प्राण्यांचं काय. त्यांच्या शरीरयष्टी बद्दल तर शिकावच लागणार शिवाय त्यांच्या मानसिकते बद्दल, जे भलं मोठं आव्हान आहे आणि प्रत्येक प्राणी आणि त्याची व्याधी / त्याच प्रमाण हे सगळं गृहीत धरून, त्यांच्या कलानी घेऊन मग उपचार करायचे.
त्यानंतर तो जर हत्ती सारखा जंगलात राहणारा प्राणी असेल, घरी नाही तर समजणार कसं कि
१. तो बरा झालाय आणि
२. तोच आला होता आधी उपचाराकरता ?
ओह, मला फारच प्रश्न पडले आहेत. पण माझ्या दृष्टीने हा एक मेडिटेटिव्ह कोर्से आणि प्रोफेशन आहे. झपाटलेला च हवा ह्या क्षेत्रात जाण्याकरता, माझ्या दृष्टीने.
हे सगळं जेव्हा मी माझ्या लेकीशी बोलत होते / डिसकस करत होते, तेव्हा तिने इतक्या अप्रतिम गोष्टी सांगितल्या मला कि जगात वेगवेगळ्या ठिकाणी कित्ती वेगवेगळे अवलिया आहेत ह्या क्षेत्रात मनापासून काम करणारे. त्यावर पुन्हा कधीतरी नक्की लिहिणार कारण ते एका लेखात मावण्यासारखं नाही ना.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा