अमेरीकेत आमच्या घरात मॉडर्न किचन होत पण अर्थात थोडसं वेगळं आपल्या इथल्यासारखं नाही आणि अर्थात तेथे आमचा लुटुपुटुचा संसार होता ना, दोघेच, फ्री बर्डस, मग काय, एन्जॉय.
पण आम्ही येथे जेव्हा परत आलो पुण्यात आणि जेव्हा आमचं घर / फ्लॅट घेतला तेव्हा आम्ही इथल्या पद्धतीचं मॉडर्न किचन तय्यार करून घेतलं. त्या किचन मधे आणि माझी नेहेमीची घाई त्यामुळे मला न नेहेमीचे डबे परवडणारे नव्हते मला वरून जिन्नस दिसणारे ट्रान्स्परंन्ट झाकणाचे डबे हवे होते. मी नेहेमी जेव्हा जेव्हा बिग बझार किंवा डी-मार्ट मधे जात असे तेव्हा तेव्हा मी सगळीकडे शोधतं असे मला हवे तस्से डबे.
कुठेही मी बाहेर खरेदीला जातांना माझी वरात असायचीच ना बरोबर, वरातीत आम्ही तिघे असायचो नेहेमीच.
एकदा माझी लेक उत्साहात बाबांबरोबर गेली बाहेर कुठे तरी, तेव्हा काही कारणास्तव ते एका मॉल मधे गेले, तेथे माझ्या लेकीला मला हवे तस्से डबे दिसले, मग तिने ताबडतोब ते बास्केट मधे ठेवले, बाबांना विकत घ्यायला लावले आणि घरी पोचल्या पोचल्या मला म्हणते कशी "बघ मम्मा, तू हेच शोधत होतीस ना बरेच दिवसांपासून, आणले बघ मी".
सहीच ना, कसं काय लक्षात ठेवून आणलं तिने, काय बोलावं तेव्हाही मला सुचलं नाही आणि आत्ताही सुचत नाहीच आहे, मी फक्त लिहिते आहे माझ्या आगळ्या वेगळ्या लेकीबद्दल. अर्थात हा एक छोटासा अनुभव आहे तिने वेगळी चमक दाखविलेल्या अनेक प्रसंगातला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा