मी अगदी लहानपणी पासून ऐकलं कि भारद्वाज हा पक्षी दिसणं / नजरेस पडणं म्हणजे अहोभाग्य, कारण त्या चा सुमधुर आवाज फक्त ऐकू येतो, पण दर्शन दुर्मिळ. तेव्हापासून न कळत पहाटे / सकाळी भारद्वाजचा आवाज ऐकला कि प्रसन्न वाटत आणि आपोआप हात जोडले जातात. पण आज चा दिवस एक वेगळीच पर्वणी घेउन उगवला. आज मी फिरायला सुरवात केली रे केली कि एका भारद्वाज चा आवाज ऐकू आला, त्यानंतर दुसऱ्या आणि मग अनेक. सहज आजूबाजूला लक्ष गेलं आणि माझी पावलं ताबडतोब थबकली, कारण आज एक नाही दोन नाही तर असंख्य भारद्वाज मला दिसले अगदी समोर उभे ठाकले होते, कोणी मान वर करून घसा साफ करत होत जसे कि, कोणी भली मोठी शेपूट पसरवून बघत होत, इकडून तिकडे आणि तिकडून इकडे सारखी लगीनघाई सुरु होती. आज काही तरी खास होतंच (इव्हेंट असेल एखादा त्यांचा) ह्यात वादच नाही. आणि तो नयनरम्य सोहोळा मी माझ्या डोळ्यांनी अनुभवाला, कानांनी ऐकला, अहाहा, माझ्या सारखी भाग्यवान मीच, नो डाऊट. त्यामुळे आज पहाटे रस्त्यावर उभं राहूनच माझ्या कॅलरी जास्त बर्न झाल्या चालल्याने नाही. पण काय अप्रतिम अनुभव होता. "न भूतो न भविष्यती" अस्साच. धन्यवाद भारद्वाज फॅमिली.
रविवार, ९ मे, २०२१
एक अनोखी लगीनघाई
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा