मागल्या वर्षी लॉक डाउन संपुष्टात आल्यावर आणि माझ्या व्हर्टिगो मुळे मी आमच्याच समोर राहणाऱ्या एका मावशींना झाडू, पोछा आणि भांड्यांसाठी बोलावलं / लावलं. दिवाळीत ठरल्याप्रमाणे किंबहुना माझ्या नेहेमीच्या सवयीप्रमाणे मी आमच्या सगळ्या शेजारच्यांना आणि ह्या मावशींना देखील फराळाचं ताट दिल पहिल्या दिवशी. माझ्या कडचे सगळे पदार्थ त्यांना दिले, त्यांना आवडले, दुसऱ्यादिवशी न चुकता त्यांनी सांगितलं मला. अजुन एक म्हणजे ह्या तिन्ही दिवाळीच्या दिवशी मावशी एकदमच मस्त नवीन साड्या नेसून आल्या होत्या आणि काल सकाळी त्यांनी त्याच्या घरी केलेला फराळ आमच्यासाठी घेऊन आल्या. मी उघडून एक घास चव घेतली आणि खरंच अप्रतिम होता चिवडा. आज पुन्हा म्हटलं बघावं चव-बदल म्हणून खाऊन तर मला काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या म्ह्णून हा लेख प्रपंच. एक तर सगळ्या साग्रसंगीत जिन्नस घालून केलेला फराळ आहे म्हणजे चिवड्यात भरपूर दाणे, खोबर, थोडासा सुकामेवा, तळलेला कांदा, हिरव्या मिरच्या, चपराख (अगदी हवं तेवढंच) आणि शांततेत भाजलेले पोहे. दुसरं म्हणजे सढळ हाताने दिलेला फराळ आहे तो. आमच्या सगळ्यांना पुरेल असा. मला खरंच आश्चर्य वाटलं. एक तर खरंच गरज नव्हती पण हि दिवाण घेवाण असते आणि उगाचच द्यायचं म्हणून मोजून- मापून दिलेलं नाही ते. त्यांच्या एवढ्याश्या घरात, मोजक्याच सामग्रीतून करून आम्हाला आणून दिला फराळ ह्याच मला अप्रूप वाटलं. त्याच्या हाताची चव अशीच शाबूत राहो आणि त्यांच्या कुटुंबाला असंच चविष्ट, पौष्टीक नेहेमी पोटभर खायला मिळो हीच ईशचरणी प्रार्थना.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा