गुरुवार, १३ मे, २०२१

इंग्लिश स्पेल्लिंग

मला अजूनही आठवतंय कि इंग्लिश ह्या भाषेची ओळख माझी फार उशिरा झाली, शाळेत असतांना. मी, माझे पालक, मित्र-मैत्रिणी आणि एकंदरीत वातावरणच मराठमोळं होत, साधं होत. पण खैर ह्या भाषेशी मैत्री करावीच लागली, झाली आणि आता वापरातली भाषा झाली जणू. फार कष्टाने सगळे चिवित्र स्पेल्लिंग्स लक्षात ठेवून वापरले अनेक वर्ष. पण आज मी हे मराठी लिखाणाकरताना जे गुगल नि दिलेलं प्लॅटफॉर्म मी वापरते तेथे इंग्लिश किबोर्ड वापरून आणि त्यामुळे इंग्लिश चेच अल्फाबेट जुळवून मराठी शब्द तय्यार करावे लागतात. देवा, आता हा एक नवीन लेअर / थर, दररोज वेगळेच स्पेल्लिंग शिकावे लागते आहे. मज्जा येते आहे पण इंग्लिश स्पेल्लिंग जर जैसे थे दिले तर गुगल सारख्या हुशार सख्याला पण झेपत नाही ते, त्यामुळे एस च्या ऐवजी सी वापरावी लागते, कधी कधी तर एक मराठी शब्द तय्यार करण्यासाठी एक एक अक्षर लिहावं लागत, मग ते जोडून अखेर पूर्ण शब्द तय्यार होतो. फोनिक्स का काय म्हणतात ना ते मराठीत आधी म्हणून मग  इंग्लिश चे अक्षर वापरून माझी गाडी पुढे जाते. पण आता हा गुगल बाबा इतका सवयीचा झाला आहे, कि आता पर्यंत जवळपास ५०० पानांपेक्षा जास्त लिखाण झालं माझं अशी कसरत करून. अर्थात मला अजून नवीन सिस्टिम्स, अँप्स शिकायच्या आहेत, पण वेळ काढावा लागेल त्यासाठी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...