आज माझ्या लेकीने कुठलातरी खिळा थोडण्यासाठी हातोडा काढला आणि मला हा विषय सुचला लिहायला. कारण? सांगते सांगते. अहो तो टूल बॉक्स एका छोटेखानी केस मधे व्यवस्थित मांडून दिला आहे. लेकीने ती टूल-केस / टूल-किट बाहेर काढली आणि ती साधारण राखाडी रंगाची होती. माझ्या बाबांच्या सगळ्या ब्रीफ केस पण विविध राखाडी शेडच्या रंगाच्याच असायच्या, दोन तीन होत्या त्यांच्या कडे, विविध आकारात / साईझ मधे. त्यांच्या गरजे प्रमाणे ते स्पेसिफिक ब्रीफ केस वापरत असतं. त्या ब्रीफ केस मधे काय असतं हे लहानपणी मला फारच अप्रूप वाटायचं. नंतर बाबांनी दाखवलं मला आणि त्यांची शिस्त देखील माझ्या डोळयांनी टिपली न-कळत. त्याच ब्रीफ केस मधे माझ्या साठी कित्येक गिफ्ट्स पण प्रवास करून आल्या आहेत अनेक वर्ष. त्यामुळे बाबांच्या ब्रीफ केस सोबत माझं एक वेगळंच नातं जडलं होत / आहे अजूनही.
त्या नंतर मी जेव्हा सिंबायोसिस जॉईन केलं तेव्हा एक प्रोफेसर अशीच ब्रीफ केस वापरतात हे जाणवलं आणि मी त्यांना माझ्या सगळ्या आठवणी सांगितल्या. ते माझ्याच बसचे सह-प्रवासी पण होते कित्येक वर्ष, त्यामुळे त्यांच्या बॅग च दर्शन रोज होत असे.
ब्रीफ केस हातात धरण्याची / पकडण्याची एक खास स्टाईल असते मंडळी, एक बोट कायम लॉक सारखं ठेवावं लागत, म्हणजे हॅन्डल ला चार बोट आणि एक झाकण धरायला, चुकून उघडू नये अचानक म्हणून. माझे बाबा देखील अर्थातच असंच उचलायचे आणि हे प्रोफेसर पण.
तर हि ब्रीफ केस इतकी खरं छोटीशी असते पण त्यात पेन ठेवायला कप्पा, फाईल ठेवायला जागा, पासबुक साठी पण ई. आणि छोटी असली तरी पुरेशी असते, आता मी प्रत्यक्षच बघितलं ना माझ्या बाबांना इतकी सलग वर्ष वापरतांना. आपल्या गरजा आटोक्यात असल्या कि हि अशी छोटीशी ब्रीफ केस पण पुरेशी ठरते. म्हणून तर तीच हे खास नाव आहे ना. मला एक भारतीय संशोधक माहित आहेत जे नेहेमीच पुण्यात / भारतात येतात अमेरिकेहून कामासाठी. ते पण ब्रीफ केस च वापरात त्यांच्या प्रत्येक प्रवासासाठी. इथे पोचले कि ४-५ नवीन कपडे घेतात, वापरतात, जातांना हॉटेल मधल्या स्टाफ ला देऊन जातात. हलका प्रवास हा त्यांचा फंडा आहे. मला जाम आवडला, म्हटलं जमल्यास स्वतः आणि सगळ्या मंडळींना विनंती करावी कि आज पासून पुढील प्रवास असाच हलका ठेऊ यात, हो, दोन्हीपण बरं का मंडळी, फिसिकल आणि मेंटल प्रवास.
मंगळवार, ११ मे, २०२१
ब्रीफ केस
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा