मंगळवार, ११ मे, २०२१

अहोभाग्य

माझा जन्म झाला तेव्हा मी एखाद वर्ष माझ्या आजीकडे राहिले होते आणि तीच घर भलं मोठं होत. इतकं मोठं कि काही भाग / खोल्या शेणाने सारवलेल्या आणि बाकी बांधलेले.  त्या घरी शेतातून आलेला माल ठेवण्यासाठी वेगळ्या खोल्या होत्या. एक वेगळी खोली होती जिला जळणाघर म्हणायचे, कारण चुलीसाठी, बंबासाठी लागणारी लाकडं आणि बाकी साहित्य त्या वेगळ्या खोलीत रचून ठेवलं जायचं.

माझ्या बाबांची सतत बदली होत असे आणि त्यांचा हुद्दा मोठा असल्यामुळे जेव्हा आम्ही नागपूरला री लोकेट झालो तेव्हा सरकारी ऑफिसर quarter उपलब्ध / रिकामे नव्हते आणि रिकामे झाल्यावर रंगरंगोटी करायची होती, त्यामुळे आम्हाला रेस्ट हाऊस मधे राहायला सांगितले, सिव्हिल लाईन्स वर होते ते.  जायंट / भले मोठे, अप्रतिमच. इतकी आजूबाजूला हिरवळ, अहाहा. प्रशस्त खोल्या आणि "चेरी  ऑन केक" म्हणजे "खानसामा". साहेबांच्या कुटुंबासाठी एक स्पेशल खानसामा होता. काय प्लॅटर / स्प्रेड असायचा पदार्थांचा, बाप रे. तिथल्या बगिच्यात मग मी माझी ३ चाकी स्कुटी पायाने ढकलत चालवायचे आणि त्या खानसाम्याची मुलं, तो, कधी कधी बाबांचा ड्राइवर ई. माझ्या मागे धावायचे, मला / साहेबांच्या मुलीला सांभाळण्यासाठी खास फौज होती ती. त्यात मी हत्तीचं पिल्लू. देवा.

मग आम्ही भल्या मोठ्या ऑफिसर्स quarter मधे राहायला आलो. मागे आंगण, पुढे अंगण, प्रशस्त रस्ते, भले मोठे मैदान / पटांगण (अनेक) शेजारी खेळायला, अहाहा. आणि शाळा एकदम हाकेच्या अंतरावर.

काही वर्षांनी बाबा निवृत्त झाले आणि आम्ही आमच्या स्वतःच्या बंगल्यात राहायला आलो. तेथे पण झाड, झोका, अप्रतिम शेजारी / असंख्य मैत्रिणी, सगळ्या सोइ सुविधा.

मग अमेरिका, तेथे कांईड ऑफ लाकडी घर, अत्योत्तम सोई सुविधा, पोहण्याचा तलाव, चढून जाण्यास, व्यायाम करण्यास भलं मोठं गार्डन टेकडी, अप्रतिम रस्ते आणि मित्रमंडळी / शेजारी तर जगापलीकडलेच.

मग आमचं पुण्यातलं घर आणि सुखसोई, शेजारी, मित्रपरिवार, जिजामाता च्या हातून उभारलेलं मंदिर, अप्रतिम बाग, खेळण्याच्या असंख्य सुविधा आणि हि यादी प्रचंड मोठी आहे.

तर ह्या माझ्या छोट्याश्या आयुष्यात इतक्या वैविध्य, ऐसपैस वास्तू उपभोगल्या आहेत ना कि ज्याचं नाव ते, माझं अहोभाग्यचं. आज सकाळी नेहेमीच्या सवयीप्रमाणे वास्तुदेवतेला आणि सगळ्या कष्टकऱ्यांना अभिवादन करतांना हा सगळा इतिहास / चित्रपट माझ्या डोळ्यासमोर उभा ठाकला आणि म्हणूनच हा पंक्ती प्रपंच.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...