खूप
वर्षा पूर्वीच्या जुन्या आठवणी ना उजाळा देण्याचा हा छोटासा प्रयन्त आहे. आमच्या मराठमोळ्या शाळेच्या वर्गात नेहेमी प्रमाणे ५०-६० मुलं मुली होत्या माझ्या माहिती प्रमाणे. त्यातल्या काही जणांचा एक संघ आपोआप तयार झाला होता आणि आम्ही सगळे सरस्वती पूजनाला दरवर्षी कोणाच्या तरी कडे जमून चिवडा करायचो, हार तयार व्हायचा, आणि बरेच काही उपक्रम होतेच. त्यातलाच एक महत्वाचा उपक्रम जो शाळेनंतरही कित्येक वर्ष चालू राहिला तो म्हणजे वाढदिवस साजरा करणे. बापरे, आम्ही सगळे जण ज्याचा वाढदिवस असेल त्याच्या घरी पोचायचोच, येथेच्छ ताव मारायचा पदार्थांवर, गाणी म्हटली जायची, हशा पिकायचा, गप्पा आणि बडबड ह्याला तर सुमारच नव्हता. आणि हो हे सगळं आपोआप घडायचं कारण त्यावेळी WA नावाचा दोस्त / अवयव नव्हताच मुळी, कसला साधा काळा फोन असायचा / नसायचा पण आम्ही मात्र पोचलेलो असायचोच वेळेत खायला. त्या सगळ्या काकूंच्या, ताईंच्या हातची चव आता दुर्मिळच, कुठल्याही पंच तारांकित जागी पण मिळणार नाहीच अशी. आमच्याकडे फार भारी गाड्या होत्या असेही नाही, पैसे पण फार थोडे असायचे, पण त्यातल्या त्यात आम्ही सर्व प्रथम शंकरनगर मधील एका आर्चिज च्या दुकानात जायचो, एक भलं मोठं कार्ड विकत घ्यायचं, त्यात भन्नाट संदेश लिहायचे आणि सगळ्यात खाली "From All of US" असं लिहिलं कि आमची स्वारी निघायची (आमच्या संघात वास्तुविद्याविशारद हा अभ्यासक्रम करणारे दोन दोस्त होते, त्यांच्या सुवाच्य अक्षरात आणि शैलीत ते असं लिहायचे). कुठे कुठे जायचो आम्ही अगदी गिट्टीखदान ते खामला एवढा प्रचंड पट्टा पण आमच्या साठी म्हणजे आनंदच. घरच काहीही चालायचं आम्हाला, आनंदाने फस्त करायचो, कुठलीही वाद्यांची साथ नाही म्हणून अडलं नाही गाणं म्हणण्या करता. मला पुसटसं आठवत कि पदवी मिळेस्तोवर आम्ही हे सगळं मनापासून उपभोगलं. काय दिवस होते ते, हे प्रत्येक वाक्य, शब्द लिहताना आजही मला जसाच्या तस्स सगळं डोळ्यासमोर उभं ठाकलं अगदी प्रेत्येकाच्या घरी जाऊन आले मी आज, आत्ता.
अरे
हो, विसरलेच, हा लेख-प्रपंच लिहिण्याचं कारण द्यायचंच राहील कि. तर त्याच असं झालं कि आमच्या हयाच संघाचा एक महत्वाचा सदस्य आशिष ह्याच काल गाणं ऐकलं अनेक वर्षांनी, WA वर, आणि फक्त "किती अप्रतिम गायलं आहेस रे, असाच गात राहा" एवढं म्हणणं जमत नव्हतं कारण हा छोटा लेख, हे शब्द आणि आमचे ते दिवस खुणावत होते मला कि "दोन वाक्यात तारीफ करण्या पेक्षा वेगळं कर काही तरी" आणि म्हणून हे लिहिता आलं. धन्यवाद आशिष ह्या सगळ्या आठवणी ना उजाळा दिल्या बद्दल.
मंगळवार, ११ मे, २०२१
भरभरून जगलेले दिवस
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा