मंगळवार, ११ मे, २०२१

वेध...

डॉ. नाडकर्णी लिखित आणि आयोजित "वेध" नावाचा एक कार्यक्रम / "स्टेज शो" होत होता असं मला परवा समजलं यू-ट्यूब मुळे. आणि आता जस जमेल तस, तुकड्या तुकड्यात का होईना हा कार्यक्रम बघणं मला फारच आवडायला लागलंय. त्याची अनेक कारण आहेतच. एक म्हणजे प्रचंड अभ्यास करून सादर केलेला कार्यक्रम, उत्तोमोत्तम मंडळी चा सहभाग, त्यांचे अवाक करणारे अनुभव, त्यांचा साधेपणा आणि किती सांगू आणि किती नाही असं झालाय मला. प्रत्येक भागा बद्दल अनेक लेख लिहिता येतील पण काल बघितलेला, ऐकलेला आणि मनापासून आवडलेला भाग होता म्हणून कि काय हा छोटासा प्रयन्त लिहिण्याचा. काल मी बघितलेल्या भागात स्पृहा जोशी माझी अत्यंत लाडकी अभिनेत्री हिची मुलाखत होती. त्यात तिने तिच्या भूमिकांबद्दल म्हणजे लेखिका, कवयित्री, नाट्य कलाकार, दूरदर्शन आणि चित्रपट कलाकार, मुलगी आणि एक माणूस ह्या सगळ्यांचा प्रवास उलगडला. अहाहा. "जमिनीवर राहणे" / "डाउन टू अर्थ" ह्याचा प्रत्यय आला. विविधअंगी वाचन किती महत्वाचे आहे आणि ते एक माणूस कसा घडवते हे जाणवलं. तिने एक अनुभव कथन केला त्याबद्दल लिहिल्याशिवाय राहवत नाही आहे. स्पृहा लहान होती आणि त्यांच्या शाळेतल्या शिक्षिकेने एक छोटीशी "नाटुकली" बसवली, ज्यात हिची प्रमुख भूमिका होती. त्यातलाच एक प्रसंग. एक छोटा मुलगा असतो, त्याचे बाबा डॉक्टर असतात, आणि एके दिवशी तो सहज बाबांच्या चिकित्सालयात जातो तेव्हा त्याचे बाबा हिशोब लिहीत असतात, त्यात प्रत्येक रुग्णाने दिलेले पैसे . ह्याला डोक्यात विचार येतात आणि ते तो ताबडतोब कृतीत उतरवतो, घरी पळत जातो, एक कागद घेतो आणि काल आईची केलेली कामे आणि त्याच्या समोर पैसे असं नमूद करायला सुरवात करतो, उदाहरणार्थ शेजारी काकूंना आमटी ची वाटी नेऊन दिली ५० पैसे आणि बघता बघता संपूर्ण यादीच तय्यार होते, त्याची तो बेरीज करतो आणि आईला नेऊन देतो. आई बघते आणि फक्त हसते. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या उशाशी त्याची चिठी आणि पैसे असतात, आणि अजून एक कागद हि त्याला सापडतो, ती आईने लिहिलेली यादी असते ज्यात आईने केलेली कामे आणि प्रेत्येकासमोर रु. शून्य असेच लिहिले असते, अर्थातच बेरीज हि शून्यच ना मग. त्यावेळी त्या मुलाला जाणीव होते.

स्पृहा म्हणाली कि ह्या नाटुकल्यात काम केल्यामुळे प्रेक्षकांना तर नक्कीच सुरेख धडा मिळाला पण तिला हि भरपूर शिकायला मिळाले.

मला रात्री उशिरा कचेरीचे काम, घरचे काम . झाले कि वेळ मिळतो, आजकाल असे सुरेख, अप्रतिम कार्यक्रम बघायला, पण घर बसल्या फुकट बघायला मिळणं हे माझं भाग्यच, अर्थात प्रत्यक्ष अनुभवण्याची सर येत नाही त्याला, पण आता सध्या काय करणार "दुधाची तहान ताकावर".
 https://youtu.be/5GKSMpXQ6SA

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...