माझ्या पीचडी गाईड कडे
आज पर्यंत १५ जणांनी त्यांचे संशोधन पूर्ण केले आहे. आम्ही गेले कित्येक वर्ष गुरुपौर्णिमेच्या दिवशी किंवा त्यानंतरच्या रविवारी एकत्र भेटतोच, भरपूर गप्पा मारतो, एकमेकांचे अनुभव ऐकतो, एकत्र चविष्ट जेवणाचा आस्वाद घेतो आणि आमची प्रत्येक वर्षीची हि ठरलेली गाठ-भेट संपते. प्रत्येक वर्षी काही तरी नवीन असतंच आमच्या सरांकडे सांगायला, दाखवायला, जसे कि त्यांच नवीन आलेलं पुस्तक, नवीन तय्यार केलेला अँप, त्यांच्या कंपनीची भरभराट आणि बरेच काही. पण आवर्जून वर्षातून एकदा भेट होत होतीच. वेगळीच मज्जा यायची.
आज हि आम्ही पुन्हा एकत्र आलोच, अनेक नवीन विषय होते बोलण्या सारखे, अनेक उपक्रम जे विविध प्राध्यापकांनी चालू केले आहेत त्या बद्दल चर्चा झाली. सरानी नवीन प्रस्ताव मांडला एकत्र संशोधनाचा आणि आता त्यावर काम लवकरच चालू होईल. फारच अप्रतिम अनुभव होता सगळ्यांना भेटायचा, फक्त एकच छोटासा बदल होता तो म्हणजे उत्कृष्ट चहा आणि भजे प्रत्येकाने आपापल्या घरी केलेले होते, कारण भेट हि दुपारी चार सव्वा चार च्या दरम्यान संपली. हो अगदी दरवर्षी प्रमाणे एकाच ठिकाणी ठरलेल्या वेळेला सगळे जमले, गप्पा झाल्या आणि झकास वाटलं, नेहेमी लक्षात राहील अशीच अदृश्य भेट होती आजची online. "भूतो न भविष्यती" अश्या परिस्थितीत गुरुपौर्णिमेनिमित्त भेट होणं महत्वाचं होत, नाही का.
मंगळवार, ११ मे, २०२१
सदृश ते अदृश्य
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा