मंगळवार, ११ मे, २०२१

आशीर्वाद...

मला "आशीर्वाद कणिक" ह्याची एक जाहिरात प्रचंड आवडते, किंबहुना मला त्या जाहिरात लिहिणाऱ्याला भेटायचं आहे, आणि विचारायचं आहे कि इतकं अप्रतिम कसं काय लिहिता? हे मला जाणून घ्यायचं आहे. त्या जाहिरातीत असं म्हटलं आहे कि कणिक मळण, पोळ्या लाटण, भाजणं आणि घरच्यांना गरमागरम खाऊ घालणं, आजी कडून आईला, आई कडून लेकीला ह्या सगळ्याची शिकवण मिळणं म्हणजे फार मोठा आशीर्वादच आहे. किती योग्य आणि कमी शब्दात मांडलं आहे नाही?

माझी आई नेहेमी मला बोलता बोलता सांगायची बऱ्याच गोष्टी. त्यात विशेष म्हणजे थालीपीठ करतांना, भाकरी करतांना किंवा पुरण पोळी लाटायच्या आधी थोडस हलक्या हातानी थापून घेतलं जात (म्हणजे पुरण सगळी कडे पसरत) . मधे आईच्या हाताची बोट त्या थालीपीठावर, भाकरीवर उमटतात तो हि एक आशीर्वादच असतो. मला नेहेमी जेव्हा जेव्हा आशीर्वाद आट्याची जाहिरात दूरदर्शनवर येते किंवा आठवते तेव्हा तेव्हा आईची आठवण आल्याशिवाय राहवत नाहीच.

आज काय कारण हे लिहिण्याचं? आज मलाच जरा चटपटीत बदल हवा होता रात्रीच्या जेवणात म्हणून विविध प्रकारच्या भाज्या आणि पनीर घालून पराठे केले गरमा गरम आणि ते करतांना मला थोडेसे थापून घ्यायला आवडतात, माझीच बोट उमटलेली बघून आई, जाहिरात आणि अर्थातच पिढ्यानपिढ्या लाभलेला आशीर्वाद जाणवला / आठवला आणि अनुभवला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...