मंगळवार, ११ मे, २०२१

दुर्मिळ अनोखा मसाला

 मला सगळ्यात मनापासून आवडणारी कृती, गोष्ट, उद्योग म्हणजे अनेक पदार्थ तयार करणे, अगदी लहानपणापासून. आणि मी ते सतत करत राहिले. त्यात विविधता कशी येईल हे हि मनापासून प्रयन्त करत राहिले आणि यश मिळत गेलं कारण माझा प्रयोग ज्यांच्यावर होत होता तीच माणसं इतकी मनाने मोठ्ठी होती कि त्यांनी मला फक्त प्रोत्साहितच केलं. इतकं कि दर शुक्रवारी संध्याकाळी माझे बाबा चुकता विचारायचेच कि "शनिवार रविवार चा काय मेनू आहे?" माझी पण मनातल्या मनात तय्यारी असायचीच. बास मग काय, माझ्या तोंडून त्या पदार्थांची नाव निघाली कि माझे बाबा मनापासून तय्यार होऊन सगळ्या लागणाऱ्या वस्तू आणायचेच, सगळी सांगता मदत करायचे आणि मग काय प्रत्येक शनिवार रविवार अप्रतिम साजरा होत होता.

ह्या सगळ्या स्वयंपाकघरातील प्रयोगांची माझी सुरवात एका गहन प्रश्नाने झाली. माझे बाबा म्हणजे माझे बडी / मित्र पेक्षा फार वेगळे होते. त्यामुळे मी त्यांना सुरवातीच्या दिवसात विचारायची कि "माझ्या हातचे साधे साधे पदार्थ आई सारखे चविष्ट का होत नाहीत?" आधी त्यांनी मला "असं काही नाही ?" वगैरे उत्तरं दिलीत पण एक दिवशी ते म्हणालेच "तू कधी आईला स्वयंपाक करतांना नीट बघितलं आहेस का? निरीक्षण केलं आहेस का? ती जे मसाले वापरते ते तू नाही घालत गं तुझ्या पदार्थात... म्हणून असेल कदाचित चवीत बदल". "आणि शेवटी प्रत्येक हाताची चव वेगळीच असते? नाही का?" वगैरे.

मी कित्येक दिवस, महिने सगळे जमतील तेवढे मसाले घातले, उलटा-पालट केली पण तिच्या सारखी चव, छे...

मग पुन्हा माझे बडी आठवले मला. "म्हटलं सांगा ना काय मसाले वापरते आई?" तर म्हणतात कसे "आई ची एक सवय आहे बघ, सकाळ संध्याकाळी स्वयंपाक करतांना ती मोठ्याने विविध स्तोत्र म्हणते, म्हणजे आपल्याला ती कानावर रोज पडतील आणि आईची कळत एक इच्छा असते कि जे काही मी हे सगळं अन्न तयार करते आहे त्याचा सगळ्या कुटूंबाला, त्यांच्या प्रकृतीला उपयोग व्हावा. बरोबर ना? ते कुठे आहे तुझ्या सगळ्या पदार्थात?" मी ते ऐकून निशब्द झाले.

आताशा गेली - महिन्या पासून रोज संध्याकाळी तरी शुभंकरोती म्हणता म्हणता स्वयंपाक होतो आणि आई बाबाची प्रकर्षाने आठवण आल्याशिवाय राहत नाहीच. तर अशी हि अनोख्या अदृश्य मसाल्याची कहाणी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...