गुरुवार, १३ मे, २०२१

मम्मा मी बेल वाजवू?

माझा वेद अगदी लहान होता तेव्हा पासून त्याला दारावरच्या बेल च काय अप्रूप, देवा. पण मग तेव्हा त्याला कडेवर घेऊन दिवसातून एकदा तरी त्याच्या पिटुकल्या बोटांनी बेल मला वाजवावी लागेच. मला असं वाटलं होत कि थोडा मोठा झाला कि विसरेल. पण आम्ही तिघे किंवा चौघे जेव्हा जेव्हा बाहेरून येत असे तेव्हा तेव्हा त्याचा प्रश्न असायचाच "मम्मा मी बेल वाजवू?". मग त्यावर मी कधी हो कधी नाही म्हणायची. नाही ह्याच्या साठी कि काय उपयोग ना, आपण सगळे बाहेर आहोत, मग  बेल का वाजवायची? बेल वाजवण्याचा उद्देश मुळी इथे सफल होत नाहीच ना. त्यानंतर ते मोठे होत गेले (माझी पोरं) आणि मी नोकरदार आई त्यामुळे त्यांच्याच कडे फार लवकर घराची चावी द्यावी लागली. त्यामुळे पण बेल वाजवायची वेळच कधी आली नाही. आणि कोणाला इतकी बेल ची आवड असेल ह्ये मला माहितच नव्हतं. आम्ही दोघे बहुतेक रोज रात्री "शतपाउली" करण्यास, पाय मोकळे करण्यास बाहेर पडतोच, अगदी घरासमोर फक्त, तेव्हा काल बारावीतला माझा लेक म्हणतो कसा "मम्मा मी बेल वाजवू?". अगदी बाळ असल्यापासून, पहिली दुसरी पासून ते १२ पर्यंतचा प्रश्न कायम आहेच. ओहोहो. काय म्हणावं ह्याला. "लहानपण देगा देवा..." हेच खरं, मला देखील अजूनही त्यांचं लहानपण अजूनही उपभोगता येत आहे, आणि असेही असू शकत कोणी हे समजलं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...