रविवार, १६ मे, २०२१

सवय

एवढ्यातच माझ्या काही विद्यार्थ्यांनी मला सांगितलं कि आपण माणसांचे वेगवेगळे वर्ग / classification तयार करूयात त्यांच्या सवयी प्रमाणे जसे कि कोण कसं चॅट करत, कसे शब्द वापरतात, किती ईमोजी चा उपयोग करतात आणि बरेच काही. ह्याच मूळ कारण म्हणजे सध्याचा संगणकाचा आणि आप Apps चा अगणित / प्रमाणाबाहेर केलेला वापर.

ह्या चर्चे नंतर सहज लिहावसं वाटलं एका खास सवयी बद्दल. तर त्याच असं झालं कि आमच्याकडे जे चहा साखरेचे डब्बे आहेत ते फिरकीचे आहेत, म्हणजे त्यांची झाकण, काही वेढे घालावे लागतात बंद करतांना आणि उलट उघडताना. रोज त्या डब्ब्यांचा संबंध प्रकर्षाने माझ्याशीच येतो, जास्त करून. पण कधी कधी असं होत कि फक्त चहाच नव्हे तर कॉफी करतांना, अजून काही पदार्थां मधे घालायची असेल तर साखरेच्या डब्याचं झाकण मी लावलं असेल तर सहज उघडत, कारण ते सहजच लावलं असत. पण ज्या दिवशी साखरेच्या डब्याचं झाकण काही केल्या उघडत नाहीच त्या दिवशी समजायचं कि माझ्या शिवाय कोणी तरी चहा / कॉफी केली आहे. अनेक वर्ष हि सवय लक्षात आली माझ्या आणि नक्की झालं कि आमचे "हे" आहेत त्याच्या पाठीमागे. इतकं घट्ट झाकण बसवायची काय गरज आहे? हा प्रश्न जवळ बाळगून चालू आहे माझी पदक्रमणा. ह्या मागच्या - महिन्यांपासून प्रकर्षाने मला ह्या घट्ट झाकणाचा अनुभव जास्त प्रमाणात आला, तेव्हा अधिक लक्ष देऊन बघितले तर असं आढळलं कि माझा लेक देखील!! वडिलांच्या पावलावर पाऊल हो, काय निसर्गाची कमाल आहे खरं, मला तर धक्काच बसला, खरच गरज आहे का इतकं घट्ट झाकण लावायची? आणि काय मिळत हे करून? दमले मी विचार करून. बरं, निसर्गाची कमाल म्हटलं तर मग माझी लेक का नाही शिकली / तिने का नाही अंगिकारली हि सवय?

एकदा असं वाटत कि ताबडतोब बदलून टाकावेत डबे आणि सहज उघड-झाप होणारे, फिरकी नसलेले डबे आणावेत विकत, पण मग असं हि वाटत कि जाऊ दे त्यांना दोघांना आणि मला हि कधी कधी जी मज्जा येते ती येणार नाही घट्ट झाकण लावायची आणि उघडायची, नाही का? आणि अर्थातच डब्ब्यांना पण आता दोन वेगवेगळ्या प्रकारच्या हातांची सवय झाली आहे, तो बोलू शकत नसला तरीही त्याला हि काहीतरी वाटतच असणार नक्की...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...