रविवार, १६ मे, २०२१

धिरडं (maharashtrian wheat instant dosa)

माझ्या लहानपणी बद्दल जेवढं लिहावं तेवढं अपुरेच आहे. अजून एक गोंडस आठवण इथे लिहीत आहे. आमची मराठमोळी शाळा, भरपूर सुट्ट्या आणि माझी मज्जा. ज्या दिवशी सुट्टी त्यादिवशी मी एका गोष्टीची प्रकर्षाने वाट बघत असे, कि माझी आई पोळ्या कधी करते ते. कारण? अहो काय सांगू, त्या काळी परातीत कणिक मळण्याची पद्धत होती. आणि परातीतच कडेला कोरडी कणिक ठेवली जायची पोळ्यांना लावायला लाटताना. पोळ्या झाल्या करून कि कोरडी कणिक पुन्हा मोठ्या डब्यात घातली जायची नाही. मग काय, मी ओट्या जवळच उभी असायचे. त्याच उरलेल्या कणकी मधे थोडंस मीठ आणि पाणी घालून आई धिरडं करायची आणि मी ताबडतोब फस्त करायची / किंबहुना फस्त व्हायचं . अशी ती माझी ओळख त्या धिरड्याशी.

त्यानंतर धिरडं हे आवर्जून एक पदार्थ म्हणून तयार होऊ लागलं, एक न्याहारीची डिश म्हणून, कारण त्या एका छोट्या धिरड्याने माझं काय व्हायचं? कुठल्यातरी कोपऱ्यात जायचं ते.

अनेक प्रकारे आता मी धिरडं करते जस कि कणिक+बेसन, कणिक+तांदूळ पीठ, कणिक+बेसन+तांदूळ पीठ, कणिक+भाजाणी . हे तिखट पद्धतीने / प्रकारे कारण त्यात थोडास चवीला तिखट, धने पूड, भरपूर कोथिंबीर असतेच. अर्थात गूळ घालून गोड धिरडं हि अप्रतिम, चविष्ठ लागतं.

आज मी पोळ्या करून झाल्यावर उरलेल्या कणकीचे एक धिरडे केले, लागलीच लेकीला आवाज दिला, आणि आम्ही दोघींनी त्याचा आस्वाद घेतला, म्हणून हा लेख प्रपंच.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...