हा अभंग मला अगदी मनापासून फारच आवडतो, कारण "त्याच्याच" मुळे आहे सगळं, अगदी श्वासापासून ते पचनक्रिये पर्यंत. काही काहीच नाही आपल्या हातात माझ्या मतानुसार. गुरुत्वाकर्षण शक्ती, हवा, पाणी, सूर्यप्रकाश ई. आहे म्हणून धावपळ सुरळीत चालू आहे सगळ्यांची. असो. हा गाभा आहे ह्या अभंगाचा आणि अश्याच अजून बऱ्याच श्लोकांचा देखील, "ज्या ज्या स्थळी हे मन जय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे...".
अगदी तस्साच अनुभव मला नेहेमीच येत असतो आणि मी त्याची आभारी पण आहे त्याकरता. अर्थात कधी कधी माझ्या मानवी दृष्टीने जास्त होत पण हरकत नाही. हो, बरोबर ओळखलंत मंडळी, मी घर कामांबद्दलच बोलते आहे. हॉल मधून स्वयंपाक घरात गेलं कि कामं आ वाचून उभीच असतात, तेथून पुन्हा दुसऱ्या खोलीत गेलं कि तेथेही असंख्य काम दिसतात डोळ्याला. एक तर मला चार डोळे आहेत आणि त्यातनं सतत काम नजरेस पडण्याची सवय, त्यामुळे अवघड होत. अगदी नेहेमी मनात येत "जेथे जातो तेथे तू माझा सांगाती...", कामाचं काम. पण एका दृष्टीने बरंच आहे ते,का? एक तर मी अनेक अशी मंडळी बघितली आणि अनुभवली आहेत ज्यांना समोर उभी ठाकलेली कामं कधीच दृष्टीपथात येत नाहीत आणि दोन, सतत कार्यरत राहणंच बरं, नकोच ते "खाली दिमाग शैतान का घर", आणि शेवटी मी माझ्याच घरची काम करते आहे ना, मग बास आणि काम करत नाही ती होतात, शक्ती मिळते, मॅजिक आहे हे सगळं, माझ्या दृष्टीने. त्यामुळे त्या कामात देखील त्याचंच स्वरूप बघितलं आणि अक्टिव्ह मेडिटेशन ची कॉनसेप्ट आवडत असेल तर मग जिंकलंच म्हणून समजा.
सोमवार, १० मे, २०२१
जेथे जातो तेथे तू माझा सांगाती...
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा