तर त्याच असं झालं, कि काल पुन्हा १० दिवसांचा बंद सुरु होण्याआधी म्हटलं सर्व सामान आणून ठेवावं आणि त्या दृष्टीने माझी मार्गक्रमणा सुरु झाली. सगळेच डनझो कडे मिळालं नाही म्हणून गूळ मी अग्रज मधून मागवला, आणि ह्याची सुतराम कल्पना नाही आमच्या घरच्यांना. आमटी भाजीत मला गूळ घालायची सवय आहेच, पण तो पूर्ण संपल्यामुळे आणि ऑर्डर करायला थोडा वेळ लागल्यामुळे मी परवाच्या आमटीत साखर पेरली. काल रात्री चिंच गुळाचं वरण केलं तर माझी लेक ताबडतोब म्हणते कशी गुळाची चव अप्रतिम आहे, "आमटीची मजा गूळानेच आहे, हो ना ममा?". मी अवाक झाले. म्हटलं हिला एवढा छोटा बदल आणि चव धान्यात आली. आश्चर्य आहे, हि पिझ्झा, बर्गर खाणारी पिढी, साखरेचा आणि गुळाचा गोडवा ओळखते हे पाहून / अनुभवून फारच वेगळं वाटलं, आशा अजिबात नव्हती,म्हणून असेल कदाचित. तर अशा गोड गोष्टीची आठवण राहावी म्हणून हा छोटासा परिच्छेद.
सोमवार, १० मे, २०२१
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा