माझ्या मानवरूपातील एक महत्वाच्या गुरु डॉ. गौरी आणि बाकी सगळ्यांचा एक संघ / ग्रुप आहे. डॉ. गौरीच्या म्हणण्या प्रमाणे नुसतं मेडिटेशन शिकून फायदा नाही तर दरदोज साधना होणं महत्वाचं आहे शिवाय ते वागण्या, बोलण्यात आणि प्रत्येक कृतीत दिसलं पाहिजे, त्याच्या तत्वांबरोबर जगता आलं पाहिजे. हे सगळं सातत्याने करण्या करता महिन्यातून एकदा भेट झाली तर नवीन अनुभव सांगता येतात, शिकता येत, त्या मार्गावर राहण्यास मदत होते. ई. असो. तर आता त्या आमचे हे दर महिन्याचे सेशन ऑनलाईन घेतात, ठरल्याप्रमाणे महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी. मागच्या तीनही वेळेला मला मनापासून हे सेशन जे महिन्यातून एकदा येत त्याला हि उपस्थित राहता आलं नाही कारण संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होत आणि साधारणतः एक तास चालत आणि नेमकी आमच्या घरी रात्रीच्या जेवणाची घाई असते त्याच वेळात. ह्या वेळी मात्र मी पक्के ठरवले होते कि अगदी सुरवातीपासून ते शेवटपर्यंत उपस्थित राहायचंच. जवळपास संध्याकाळी पावणे पाच पर्यंत ऑफीस ची मीटिंग होती, मग चहा आणि व्यवस्थित दोन तीन प्रकार करून सर्वांना खाऊ घातले, अती जलद गतीने संपूर्ण स्वयंपाक करून ठेवला, देवापाशी दिवा लावला आणि शांतपणे सगळं आवरून आनंद उपभोगायला बसले. माझी हि सगळी धडपड बघून कन्यका म्हणते कशी "कशाला एवढी घाई ममा, काय मिळणार आहे, का करायची आहे तुला मेडिटेशन ची मीटिंग, कशा साठी हे सगळं?" मग मी तिला शांतपणे एका बाजूला हात चालू ठेवत समजावून सांगितलं कि आम्ही एक तास मेडिटेशन करत नाही. डॉ. गौरी आम्हाला आधी त्या दिवशीचा विषय सांगतात, काही उपयोगी गोष्टी सांगतात, अनुभव कथन करतात, हे सगळं करतांना "श्री. भगवत गीतेचा आणि त्यातल्या श्लोकाचा" आधार घेतात, तो म्हणून दाखवतात, अर्थ समजावून सांगतात, कबीरांचा एखादा दोहा हि असतोच, त्या नंतर त्या विषयाला अनुसरून प्रचलित गाणं स्वतः म्हणतात गिटार च्या साथीने, आम्हाला हि प्रोत्साहित करतात म्हणायला आणि त्यानंतर होत छोटंस मेडिटेशन. हे सगळं झाल्यावर ग्रुप मधल्या सगळ्यांशी संवाद साधला जातो. असं समजावून सांगितल्या नंतर मी माझ्या कन्येला विचारलं "आता सांग डॉ. एवढ्या तय्यारी करतात, वाचतात, मनन-चिंतन करतात, ठरवतात सेशन कसे घ्यायचं ते, त्यांच्या घरून क्लिनिक ला आवर्जून ह्या सेशन करता येतात, मग मला साधं ऐकता येत नाही?" मग तिला एकदम पटलं माझं म्हणणं, असो.
मी आज संपूर्ण सेशन ऐकलं, बऱ्याच सांगितलेल्या गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयन्त करणार आहे.
सोमवार, १० मे, २०२१
ध्यान साधना ... (मेडिटेशन मिटिंग )
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा