सोमवार, १० मे, २०२१

छूटकी

 आज माझी एक मिटिंग चालू होती, हस्ती मोठी होती, मोठ्या हुद्द्यावर काम करणारी, मी वेळेआधीच संगणकावर दाखल झाले. तेवढ्यातच एका छोट्या पिल्लू चा गोड आवाज ऐकला आणि राहवून मी विचारलेच तिच्या बद्दल. अर्थात मी आधी तिच्या बोलण्यावर मनसोक्त हसले म्हणूनही कदाचित तिने दर्शन दिलेच. साधरणतः तिसरीत असेल असा अंदाज.  

बरं मग त्यानंतर आमची मिटिंग सुरु झाली आणि अचानक पुन्हा घोषणा झाली "आई जरा शांतपणे बोल ना$$$$", अर्थात इंग्लिश भाषेत, अहाहा, लई भारी

मिटींग चालूच होती आणि मधेच पुन्हा आगमन झाले आणि अजून एक घोष वाक्य होत "माझा अपमान होत आहे आई, बाकी सगळ्यांना प्रश्न विचारले जात आहेत, पण मला नाही विचारत आहे, हे काय?", ऑनलाईन शाळा सुरु होती तिची समांतरपणे,  

मी खूप खूप दिवसांनी इतकं पोट भर हसत होते. मग आई नी समजावून सांगितले कि तुझ्या वर्गात खूप विद्यार्थी आहेत ना, तुला थोड्या वेळाने विचारतील प्रश्न, पटलं बावा एकदाच. काही वेळातच पुन्हा मला हसावंच लागलं कारण मोठ्याने मागे विचारलेल्या प्रश्नांची उत्तर दिली गेली पण मोठ्याने / खणखणीत आवाजात एक प्रश्न हि विचारला गेला "टीचर आम्हाला विचारलंत कि लॉक डाऊन मधे काय केलंत, तुम्ही काय काय केलंत हे सांगा ", बापरे. त्या नंतर हि मीटिंग सुरूच होती, प्रश्न सतत आईकरता येतच होते, आई आमच्याशी मीटिंग करत होती, त्यामुळे तिच्याशी बोलणं होत नव्हतं, मग एक चिठ्ठी आली, त्यात लिहिलं होत "Excuse me mom". अरे देवा, मी हा सगळा प्रसंग माझ्या मुलांना सांगतांना सुद्धा पुन्हा तेवढंच हासले मी खळखळून. कधी एकदा त्या पिल्लू ला जाऊन भेटते असं झालंय मला.

छोटीशीच आणि थोड्याश्या लोकांसोबतच मिटिंग होती, सगळेच आनंद घेत होते ह्या सगळ्याचा. वाह वाह, नेहेमी करता लक्षात राहील मला हि छूटकी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...