सोमवार, १० मे, २०२१

आमचा शेजारी

 आज कदाचित गुरुवार म्हणून कि काय साधरणतः अकरा वाजता दिवे गेले सकाळी आणि संध्याकाळीच आले. दुपारी आमचा शेजारी आला आच्छादक / मास्क घालून विचारायला दिवे गेलेत का म्हणून. आमचं संभाषण चालू होत, आणि त्याने मला विचारलं "तुम्ही कळवलं का दिवे गेलेत म्हणून?" मी म्हटलं "हो, दोन प्रकारे कळवलं, एक वा वर / WhatsApp वरआणि App वर पण".  

आमचं हे संभाषण सगळं हिंदी भाषेत चालू होत. शेजारी म्हणाला मला हि सांगा कोणता App ते, मी हि कळवतो. मी म्हटलं बरं सांगते. तर तो विचारतो "अँप का नाम क्या है?" मी म्हटलं "प्रिती मुळे", तो पुन्हा विचारतो "अँप$$$ का नाम क्या है?" मग मी त्याला लावलेली पाटी दाखवली जी इंग्लिश मधे लिहिली आहे. तर म्हणतो कसा "वो नही, कंप्लेंट कहा करना है?" आणि मग त्याच्या मोबाइल फोन वर दाखवतो हाच अँप आहे का तो म्हणून, देवा, त्याच्या आच्छादका मूळे किंवा माझ्या अप्रतिम हिंदी मूळे आज फारच मज्जा आली. वा. असं हि कधी कधी व्हायला हवं नाही का?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...