माझ्या लहानपणी शाळेकडून बहुतेक सांगितलं जायचं कि डब्ब्यात कोरडी भाजी-पोळी द्या. त्यामुळे आई सगळ्याच भाज्या परतवून द्यायची. तिच्या हातचं सगळंच उत्कृष्ट लागायचं, पण काचऱ्या चे एक वेगळे भन्नाट स्थान होते. इतके मोठे महत्व होते कि एखाद पोळी जास्त खाल्ली जायची. अर्थात एक छोटीशी अडचण पण होत असे कधी कधी. ह्या भाजीला तेल जरा प्रेमाने घालावं लागायचं, बास मग काय कधी कधी ते डब्याच्या बाहेर येणं होत असे, पण सगळं मान्य होत मला त्या भाजीच्या प्रेमापोटी.
आज आईची, डब्याची, आमच्या शाळेत डब्याच्या शोधात असणाऱ्या वानरांची, शाळेच्या दिवसांची, आठवण काढत मी झक्कास बटाट्याचे पातळ काप करून भाजी केली, मनसोक्त फस्त केली देखील. मला तर नुसतीच खायला देखील आवडते ही भाजी.
"लहानपण देगा देवा...."किती साजेस आहे
ना हे वाक्य / वाक्प्रचार.
सोमवार, १० मे, २०२१
बटाटयाच्या काचऱ्या...
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा