सोमवार, १० मे, २०२१

सुरई

माझं बालपणीपासून संपूर्ण पदवीपर्यंतचं शिक्षण उष्ण शहरात नागपुरात गेलं, त्यामुळे रांजण, माठ, सुरई ई. अविभाज्य भाग होते रोजनिशीतले. हो, रोजनिशीतले ह्या मुळे कारण माठ अथवा आणि सुरई हि रोजच्या रोज भरावी लागते, त्या वेळी पाणी येण्याची वाट पाहावी लागत होती. प्रचंड उन्हाळ्यामुळे गार पाणी लागायचंच सतत सर्वांना, शिवाय सुट्टी म्हणजे आम्ही सगळे घरी, आणि झिरपणे हा माठाचा स्वभाव त्यामुळे पण रोज पाणी भराव लागायचंच. असो. 

मला अजूनही आठवतं कि पहिल्यांदा मला सुरई ची जी ओळख झाली ती एका फुलदाणी सारखी दिसणारी मोठ्या आकाराची मातीची अशी. त्यातून पाणी ओतून घेणं लहान्यांना जरा अवघडच होत. Brown Clay Surai, Rs 250 /piece AL-Mubarak The Islamic World | ID:  18621545997

त्यानंतर आली ती सुरई विथ हॅन्डल आणि एक सुबक सजवलेले कोरीव काम केलेलं तोंड. त्यामुळे पाणी ओतून घेणं जरा सुलभ झालं, वरून पाणी भरायचं आणि ह्या आउटलेट मधून पाणी पेल्यात ओतून घ्यायचं. Best homemade surai online in India | Zupppy

त्यानंतर अजून एक भर पडली, सुरई विथ दोन तोंड विदाउट हॅन्डल. एकेकडून पाणी भरायचं जे मोठं आकाराचं इनलेट +आउटलेट  आणि दुसरं छोट्या आकाराचं, आणखी सोयीचं.  Buy Tribal Culture Clay Surahi/Surai/Clay Jug with Lid/Water Cooler/Brown  (4 LTR, Standard) Online at Low Prices in India - Amazon.inBuy Tribal Culture Clay Surahi/Surai/Clay Jug with Lid/Water Cooler/Brown  (4 LTR, Standard) Online at Low Prices in India - Amazon.in

अनेक वेळा सुरवातीला ग्रीप नसल्यामुळे किंवा किती भरली आहे आणि किती वाकवून पाणी घ्यायचं पेल्यात हे गणित माहित नसल्यामुळे पाणी सांडायचं, सुरईला भेग पडायची, विचारू नका. पण फारच वेगळी गम्मत होती. काय दिवस होते ते. अहाहा. तर अशीही सुरईची आठवण / आठवणी माझ्या.  माझी आई तिच्या एका भजनात म्हणते त्याप्रमाणे  "तुझे माझे नाते अनेक जन्मीचे, अनोखे...", असंच काहीस. 

These pictures are taken from various internet sources like zupppy.com, indiamart.com, amazon.in etc.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...