सोमवार, १० मे, २०२१

रांजण भरणारी मावशी...

मी दहावी नंतर पॉली टेकनिक ला जेव्हा प्रवेश घेतला त्या वेळी माझी अनेक नव्या मैत्रिणीशी, शिक्षकांशी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी ओळख झाली. त्यात एक रांजण भरणारी मावशी चा पण समावेश होता. रांजणाचा आकार भला मोठा असतो आणि त्यामुळे पाणी भरायला पण वेळ लागत असे, त्या काळी. त्या मावशी छोट्याश्या, तरुण आणि अतीउत्साही अश्या होत्या. माझा आणि माझ्या मैत्रिणीचा बोलका स्वभाव त्यामुळे मावशींशी संवाद साधला जायचा. एकदा त्या अश्याच आमच्या ग्रुप कडे आल्या आणि हातात वही+पेन्सिल होती. आम्ही अवाक, हे काय? विचारलं तर म्हणतात कश्या, "मला न अंग्रेजी शिकायचं आहे, तुम्ही शिकवाल?, मी वही+पेन्सिल पण आणली आहे, कधी सुरु करायचं?, किती वेळ लागेल" ई प्रश्नांची सरबत्ती सुरूच होती, आणि आम्ही सगळ्या अजूनही अवाक स्थितीतच होतो. आम्ही पण मग काही प्रश्न विचारले मावशीच्या शैक्षणिक बॅकग्राउंड बद्दल आणि उद्या पासून सुरु करू असं सांगितलं. बास मग काय, झाला श्री. गणेशा. आधी छोटे शब्द, मग अगदी छोटी वाक्य असा प्रवास प्रचंड वेगाने सुरु झाला, कारण मावशींना कमी वेळात खूप काही शिकून घ्यायचं होत. देवा. आम्ही मस्ती म्हणून "थँक यू" कोणी म्हटल्यावर "डोन्ट मेन्शन" आणि इतरही छोटे वाक्य शिकवले, आणि सांगितलं पण होत, कधी काय वापरायचं ते. आमच्या एका शिक्षिकेला ते समजलं, मग त्याही मावशींशी इंग्लिश मधे संवाद साधू लागल्या. एकदा मॅडमनी गमतीने इंग्लिश मधे काही विचारलं मावशींना, आणि त्यांनी नॉर्मल उत्तर नाही दिलं, झालं मग आलं ना आम्हाला बोलावणं. अश्या त्या विस्मृतीत न गेलेल्या काही गोड आठवणी रांजण भरणाऱ्या मावशींसोबतच्या. सहीच.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...