का कुणास ठाऊक पण माझ्या लहानपणी जरी आम्ही शहरात राहात असलो तरी देखील पँट्स हा माझ्या वॉर्डरोब / कपाटाचा कधीही हिस्सा नव्हताच. कारणं अनेक आहेत आणि त्यातलंच एक मी येथे देणार आहे आज. संपूर्ण वर्ष हा एक उत्सव असायचा माझ्या लहानपणापासून नागपुरात, सतत हाताला मेहेंदी असायचीच. आधी सुंदर सुंदर फ्रॉक, नंतर खणाचे अप्रतिम परकर-पोलके, मग पंजाबी, त्यानंतर साडी मग नव्वारी असा च झकास साज असायचा. संक्रांत सण, मग अनेक असंख्य घरी हळदी कुंकू, गजानन महाराजांचा उत्सव, श्रावण सोमवार, मंगळागौरी, श्रावण शुक्रवार हळदी कुंकू, महालक्ष्म्या, गणपती, दसरा, दिवाळी.... अशी लांबलचक यादीच आहे. मंगळागौरी म्हटल्या कि घरी दारी शेजारी कुठेही असोत आम्ही हजर. मैत्रिणीच्या वाहिनीची, शेजारी असो अगदी पत्री जमा करण्यापासून ते पूजा झाल्यावर मंगळागौर सजावण्यापर्यंत, वाढण्यापासून - स्वयंपाकात मदत ते यथेष्य आवडीने सगळं ताव मारण्यापर्यंत मजल असायची आमच्या सगळ्या मैत्रिणीची. बरं मंगळागौर म्हटली कि जरा दुपारच्या जेवणाला उशीर व्हायचाच कारण त्यावेळी कोणालाच घाई नव्हतीच. वहिन्या पण नोकरी न करणाऱ्या बहुतांशी. असं उशिरा आणि साग्रसंगीत जेवून देखील पुन्हा संध्याकाळची डिश खायला हजर आम्ही आणि तेही पोटभर. देवा. सतत उत्सवाचं वातावरण सर्वत्र. कुठीही मोजमाप नाही, ह्यांच्या कडे कसं जायचं, कसं आणि किती खायचं, किंवा किती माणसांचाच स्वयंपाक करायचा, छे छे. आधीच मी नागपूरकर, त्यात खवैयी, उत्सहाला तर उधाणच, कामाला वाघ मग काय संपूर्ण समीकरण अतिशय भन्नाट. आणि आज गेले वर्षभर साधारणतः फक्त पँट्स आणि टी-शर्ट घालुन बसले आहे. २२ एक वर्षांपासून उत्सव क्वचितच साजरे झाले. कदाचित "त्याला" माहित होत कि मी अशी होणार आहे नंतर म्हणून, त्यामुळे त्याने आधिच मला सगळं उपभोगायला दिल, भरभरून. त्यात कधीही म्हणजे कधीही माझ्या आई-बाबानी मला अडवणूक केली नाहीच. पण हा बदल फारच टोकाचा होता माझ्या साठी प्यारेडिम-शिफ्ट. पण हरकत नाही, दोन्ही टोक अगदी भरभरून जगले मी, प्रवास वाखाणण्याजोगा च होता / आहे. अर्थात कधीच कल्पना देखील केली नव्हती कि वैविध्य पँट्स च माझ्या वार्डरोब चा हिस्सा होतील ते.
शनिवार, १५ मे, २०२१
नो-पँट्स ते फक्त-पँट्स प्रवास
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा