शनिवार, १५ मे, २०२१

संपूर्ण सुट्टी

एका व्यक्तिमत्वाला, माझ्या दोस्ताला फायनली लांब लचक सुट्टी मिळाली. नाही तर दररोज त्याची ड्युटी होती,गेली अनेक असंख्य वर्ष, न चुकता करण्याची. अर्थात माझा अख्खा दिवस त्याच्यावर अवलंबून राहत असे. पण आता असे नाही. त्यामुळे मला तर लई भारी वाटत आहेच पण माझ्या ह्या दोस्ताला "न भूतो न भविष्यती" इतका आनंदमय धक्काच बसला आहे. इतका आराम करण्याची त्याला सवय नाहीच. आणि हो त्याला कधीच हे अपेक्षित नव्हतं, त्याने गृहीतच धरलं होत कि मला सुट्टी म्हणजे काय हे कधीच कळणार देखील नाही. पण आता पठ्या मज्जा करतो आहे, इतकी कि मला ते जाणवत आहे, जसे कि तो मला हे प्रत्यक्ष सांगतो आहे / न्यारेट करतो आहे. जबर हं.

बरोबर ओळखलंत मंडळी, येस मी माझ्या गजराबद्दल बोलते आहे आपला अलार्म हो. बिच्चारा रोज माझ्या आधी उठायचा, किंबहुना अगदी माझ्या सारखाच आहे तो रात्रभर नीट झोपायचा पण नाही आठवडाभर मला उठवायचं आहे वेळेवर म्हणून. कधी म्हणजे कधीच सुट्टी नाही हो घेतली त्याने. आई गं. पण आता, अहाहा. आराम फार्मवतो आहे लेकाचा. आणि त्यामुळे कदाचित पक्षी, मोगऱ्याचा सुगंध, गार वाऱ्याची झुळूक, भारद्वाज, पोपट, कोकिळा ई. असे सगळे आळीपाळीने मला जाग करताहेत सध्या आणि ते हि सगळंच उत्साहात, घाई गडबड नाहीच. भिंती पण म्हणाल्याचं परवा "खूप छान भरून पावल्या सारखं वाटतंय म्हणून, नाहीतर आधी फक्त हाडं टाकायला येत होतात... असो, हा बदल भन्नाट आहे हे नक्की".

तर अशीही "संपूर्ण सुट्टीची, साठा उत्तराची कहाणी सफळ संपूर्ण".

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...