माझे बाबा सिव्हिल इंजिनिअर असल्यामुळे मी अगदी लहानपणीपासून बघते आहे त्यांना दौऱ्यावर जातांना. ते धरणं, रस्ते, महामार्ग ई. बांधायचे आणि त्या करता त्यांना प्रत्यक्ष जागी जाण आवश्यक होतच. त्या काळी फक्त जीप असायची आणि त्यातूनच मग त्यांचे दौरे होत असत. फोन वगैरेची सुविधा इतकी सुलभ नव्हती. तर अगदी निवृत्त होईस्तोपर्यंत त्यांचे दौरे चालूच होते.
माझी मुलं झाल्यापासून मी आधुनिक पद्धतीचे दौरे अनुभवयाला सुरवात केली. ह्यांना क्लायंट कडे जावं लागायचं. मुलं झाल्यानंतर त्यांचा कामाचा व्याप वाढला किंबहुना त्यांनी वाढवून घेतला असं म्हणायला हरकत नाही. असो. तर हे जेव्हा जेव्हा दौऱ्यावर जायचे तेव्हा तेव्हा मला अनेक फोन येत असत धन्यवाद द्यायला. कोणाचे? म्हणताय, सांगते हो. ऐका.
प्रत्येकाच्या हाताला लागलेली सवय तशी ह्यांना देखील. अजून एक म्हणजे मी, माझ्या सासू बाई आणि हे, आम्हाला एक सारखी सवय आहे, दार बंद झाले कि नाही हे पुन्हा एकदा तपासून बघायचं पण शांत पणे. पण ह्यांच्या सवयी जरा अनोख्या आहेत, होत्या. नकळत सवयीमुळे प्रत्येक दार, प्रत्येक वस्तू चा इतका आवाज करतात हे कि ज्याचं नाव ते. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते पूर्णपणे अनभिन्य आहेत हं. मलाच येतो आवाज फक्त, त्यांच्यासाठी हे रुटीन आहे, सवयीचं आहे,नॉर्मल आहे. बिच्चारे सगळे जीव ह्यांच्या प्रत्येक दौऱ्या दरम्यान आवर्जून मला अनेक फोन करतातच आणि सांगतात कि किती शांत वाटतंय, कुठलीही दुखापत होत नाही आहे, आम्हाला लागत नाही आहे, ई. कारण निर्जिव असले तरी इतकी वर्ष जोरदार पद्धतीने हाताळल्यामुळे ते जीव दुखावत असतील ना. देवा.
ह्यांच्या अश्या दौऱ्यांमुळे गेली १५ वर्ष सहज ह्यांना जगाच्या पाठीवर असलेले सगळे देश बघायला मिळाले, आम्हाला अनेकविध चॉकलेट्स खायला मिळाले कारण दौरे हे आंतर्देशीयच असायचे, गिफ्ट्स मिळायच्या आणि आमच्या घरच्या सगळ्या दारांना आणि इतर वस्तूंना शांत आराम आणि वेदनामुक्त दिवस. अहाहा.
Listen to this story on YouTube, press this link: https://youtu.be/Yf16S23sn18
Also find me on FB and Twitter.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा