शुक्रवार, २८ मे, २०२१

नवीन नवलाईचे दिवस


हि मागल्या एप्रिल-मे २०२० मधली घटना आहे. तेव्हा नुकतंच "न्यू-नॉर्मल" "ऑनलाईन शिकवणं" ई. जन्माला आलं होत आणि सगळे जण विद्यार्थी आणि शिक्षक घरी होते. सगळ्या परीक्षा आणि उरलेलं शिकवणं घरून सुरु होत, विविध प्रयोग, नवीन प्लॅटफॉर्म शिक्षण सगळंच एकत्र सुरु झालं होत. त्यातच एकदा मी एक परीक्षा घ्यायला सुरु केली तर काही जणांनी शांततेत दिली पण एक मात्र "ह्या जगावेगळी" होती. तिने जसे हि अनम्युट केले स्वतःला आणि बोलायला सुरवात केली तशी भांडी पण बोलू लागली, फार च आवाज येत होता. मला वाटलं आता थांबेल मग थांबेल, मग कुकर च्या शिट्ट्या सुरु झाल्या, 

मग मात्र मी न राहून विचारलंच 

"इतका आवाज का येतो आहे? तू कुठे आहेस?" ई. 

तर ती म्हणते कशी "मॅडम मी स्वयंपाक घरात बसले आहे", 

"का?" माझा ताबडतोब दुसरा प्रश्न. 

"मॅडम स्वयंपाक घराशिवाय दुसरीकडे घरात कुठेच वाय-फाय चा सिग्नल येत नाही, त्यामुळे काही पर्याय नाही". आता काय बोलायचं. म्हटलं जाऊ दे. 

आज पुन्हा तसाच अनुभव आला. प्रेझेंटेशन सुरु होत आणि एका विद्यार्थ्यांचा टर्न आला कि भांडी बोलायला लागली. 

एक तर विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या घरच्यांनी सुद्धा थोडीशी काळजी घ्यायला हवी ना?, आणि बहुतेक सगळेच चांगल्या परिस्थितीनं असलेले विद्यार्थी आहेत, ज्यांच्या कडे विविध खोल्या, आजूबाजूचा आवाज न येणार हेडफोन घेणं सहज शक्य आहे. 

तरी पण. असो. अशी करमणुक हवीच ना अधे मधे, कधी कधी. नाही का मंडळी?
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...