शुक्रवार, २१ मे, २०२१

मी आणि माझं चालणं ...

परवा पासून ह्या वर्षीच नवरात्र चालू होत आहे. सगळ्या आठवणी ताज्या झाल्या. नवरात्र आणि प्रदर्शिनी ह्याच एक वेगळंच नातं होत, माझ्याशीच नाही तर माझ्या सगळ्या सख्यांशी देखील. माझ्या लहानपणी आम्ही नागपूरला राहत होतो. तिथे प्रथाच म्हणा ना, राम-नगर ची आणि धंतोलीची दुर्गा प्रदर्शिनी बघणे, जमल्यास एका पेक्षा अनेक वेळा जाऊन येणे असं होताच. रावण दहन तर कधी म्हणजे कधीच चुकवलं नाहीच. माझ्या पेक्षा माझ्या वडिलांना जास्त उत्साह असायचा. घेऊनच जायचे.

राम-नगर प्रदर्शिनीची गोष्ट जरा वेगळी होती. आमच्या रविनगर पासून जवळ होती. आमच्या शेजारी एक कुटुंब राहत होत, दोन बहिणी, आई वडील आणि आजी. तर त्या आजीचं आमच्या बरोबर नेहेमी यायच्या प्रदर्शिनी बघायला. आजी असून देखील सगळं खूप आनंदानी सहभाग घ्यायच्या. आम्ही सगळे पायी येत असू प्रदर्शिनी बघायला. तेवढेच पैसे एखाद्या आकाश पाळण्यात अजून एक चक्कर मारण्यास उपयोगी येत असे. -१० दिवसात - चकरा राम नगरच्या आणि नक्की धंतोलीची असायचीच.

त्यानंतर मोठी झाल्यावर हैद्राबादला शिकायला गेले, तिथे देखील जवळपास - कि. रोज चालणं व्हायचाच, हॉस्टेल पासून ते बस थांबा, त्यानंतर कॉलेज आणि पुन्हा परत. पुण्यात कचेरीत बस ने जायचे तेव्हा पण चालण्याचे अंतर बरेच होते. माझं गणित छानच होत मागल्या वर्षी पर्यंत चालण्याचं. आता सध्या सर्वच ठप्प आहे, पण लवकरच सुरवात होईल अशी आशा.

आता अजूनही त्या दोन प्रदर्शन्या चालू आहेत का माहित नाही, पण असतील तर पुढल्या वर्षी जावं म्हणते. पुन्हा एकदा सगळं अनुभवता येईल, ते पाळणे, मसाला पापड, आरसे, मोटर सायकल चा खेळ, आणि बरेच काही. अहाहा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...