का कुणास ठाऊक पण मी घर-एके-घर आणि तदनंतर कचेरी, एवढाच दिनक्रम ठेवला आहे, किंबहुना मला तेवढंच जमत असं म्हणा. तिसरी गोष्ट किंवा काम मला जमत नाही. समाज कार्य खूपच दूर राहिलं. त्यामुळे कदाचित पण मलाही खूपदा वाईट वाटत, जेव्हा मी माझे आजूबाजूचे, ओळखीचे लोक प्रचंड सामाजिक कार्य करतांना बघते, त्यांचे अनुभव ऐकते...
माझं जे छोटंसं कार्य क्षेत्र आहे त्यात संशोधन आणि लेखन करणे हे प्रामुख्याने करावं लागत. संशोधन लेख / पेपर लिहायचं म्हणजे काहीतरी नवीन माहिती सादर करावी लागते. त्या साठी खूप वाचन करावं लागत. वाचन म्हणजे विविध संशोधन केलेले लेख वाचणे. जे लेख महत्वाचे आहेत, कामाशी संबंधित आहेत ते सर्व यादी करून आपल्या पेपर मध्ये नमूद करणे, हे फारच महत्वाचे असते. थोडक्यात काय तर त्या लेखकाला, त्याच्या ज्ञानाला, त्याच्या लिखाणाला आणि एकंदरीत त्याने केलेल्या संशोधनाला महत्व देणे, त्याचा पुरावा देणे ई. नावीन्य पूर्वक विचार करून, तसे नवीन काम करून, जमल्यास विविध क्षेत्राशी संबंध जोडणे वगैरे हे अवघड आहे.
त्यामुळे फक्त माझ्या दृष्टीकोनातून, माझ्या प्रत्येक लिखाणात मी जी यादी देते, अनेक लेखकांचं काम साईट करते म्हणजेच सत्कार्य करते, एक प्रकारचं सामाजिक काम करते. छोटंसं का होईना पण हे काम माझ्या हातून भरपूरदा होत आणि त्यामुळे आता मला अपराधी वाटत नाही.
शुक्रवार, २१ मे, २०२१
पुंण्याच काम...
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा