मंगळवार, २५ मे, २०२१

नाविन्यपूर्ण आरसे

आजकाल आपण वैविध्य स्क्रीन नी गुरफुटलो / गुंफालो आहोत. लॅपटॉप ची, डेस्कटॉपची, मोबाईल ची, बाप रे कित्ती आणि सगळीकडे आरसेच आरसे अहाहा. जेव्हा हवं तेव्हा बघता येण्या साठी आणि जेव्हा हवं तेव्हा उत्तर मिळवण्यासाठी, "मिरर मिरर सगळ्यात छान कोण?" असंच काहीस. आणि स्वतःचे बा$$$$रीक निरीक्षण करण्यासाठी. हवं तेथे हवं तेव्हा हवं$$$$$$ तेवढ्या वेळ.

आधीच्या काळी एकतर अगदी छोटा चौकोनी स्टॅन्ड असलेला आरसाच बहुतेक असायचा घरी, एक नाहीतर जास्तीतजास्त दोन संपूर्ण घरात हो, नंतर नंतर मग सर्व सामान्यांकडे हे भले मोठे आरसे आले, पण आता उपलब्ध असलेल्या "जागी स्थळी पाषाणी" आरस्याची गोष्टच वेगळी. जो तो बघत असतो सदांकदा, सगळेच त्यात मग हं, लहान, थोर, मोठे, स्त्री पुरुष मंडळी. देवा. तोंड वेडे वाकडे, डोळे इकडे तिकडे आणि जाऊ दे, भर रस्त्यात, जेथे हवं तेथे, कोणाची म्हणजे कोणाची तमा न बाळगता चालू. काय बोलावं कळत नाही आहे.  इतक्यांदा दिवसातून बघितल्यावर प्रतिमेत हवी तशी सुधारणा होते का? हं, खूप मोठा आणि ज्वलंत अनुत्तरित प्रश्न आहे हा. चला तर मग आजपासून हे सगळे विविध आकार-प्रकारचे आरसे काय काय सांगताहेत आपल्याला ते बघुयात, ऐकूयात आणि हवे ते गरजेचे बदल टिपून करूयात.  

त्यात अजून एक भर पडली आहे गेल्या दीड दोन वर्षांपासून, ते म्हणजे लॅपटॉपची आणि बाकी सगळ्या स्क्रीन शिवाय ऑनलाईन मिटिंग चे प्लॅटफॉर्म्स आणि व्हिडिओ ऑपशन. भरभरून बघा स्वतःला. देवा. बास. पुरे आता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...