बुधवार, २६ मे, २०२१

पत्ते

पत्ते माझे फार जुने मित्र, अजूनही मैत्री टिकून आहे, घट्ट अशी, इतक्या वर्षानंतर देखील. फारच लवकर ओळख झाली माझी त्यांच्याशी, अगदी छोटे पत्ते माझ्या लहान हातात मावणारे माझ्या बाबांनी आणून दिले, शांतपणे अगदी उत्कृष्ट रितीने खेळायला शिकवले, स्वतः खेळले माझाशी आणि ते स्वतः देखील पेशन्स नावाचे खेळ स्वतः खेळत असतं अनेक तास, निवृत्त झाल्यावर खास करून. ह्या सगळ्यामुळे कदाचित मला प्रचंड उत्साह आणि आवड पत्ते खेळायची. अजून एक कारण आठवलं मला, माझी आई मी अगदी लहान बाळ असतांना रेगुलर क्लब मधे जात असे आणि फारच प्रसिद्ध होती ती. ती बसली खेळायला कि कोणाची बिशाद नाही जिंकायची. अर्थात बाबांच्या मोठ्या पोस्ट मुळे हे क्लब म्हणजे फक्त "गेट-टुगेदर" असायचं, पैसे लावून वगैरे नाही. असो.

माझ्या लहानपणी नागपुरात उन्हाळ्यात बहुतेक सगळेच रात्री बाज किंवा लोखंडी पलंगावर बाहेरचं झोपायचे. संध्याकाळी अंगणात सडा टाकला, मैदानी खेळ खेळून झाले, शुभंकरोती झाली कि आम्ही सगळे काय काय भन्नाट गेम खेळायचो पत्त्यांचे. मग कसं तरी गिळायचं आईची आरोळी ऐकली कि, आणि पुन्हा सुरु. शप्पथ काय दिवस होते ते.

आमच्या दोघाच्या सुरवातीच्या दिवसात अमेरिकेत शुक्रवार / शनिवार रात्री बसायची आमची मेहफिल, रात्री ७.३०-८ पासून ते जवळपास ३.३० पर्यंत पहाटे, जेवण वगैरे सगळं एकत्र, एवढा गोतावळा होता म्हणून सांगते, देवा. मग मी अमेरिकेत नवीन अंतर्देशीय उनो आणि कित्येक गेम ज्यात वैविध्य पत्ते वापरले जात ते शिकले आणि उनोत शक्यतो मी च जिंकत होते, कोणी माझ्या शेजारी बसायला देखील तय्यार नसायचं उनो खेळतांना, ओह गॉड, काय मज्जा यायची, मस्त पकड आली होती त्या उनो गेम मधे तेव्हा. किती$$$$$ वर्ष खेळलो आम्ही, बा$$$$$परे.  आणि आता तीच परंपरा तशीच सुरु आहे, जसा वेळ मिळेल तसा मुलांबरोबर विविध पत्त्यांचे डाव रंगतात. आम्ही तिघे तर असतोच बहुतेक, चौथा मेंबर कधी कधी, अधे-मधे.  सगळं सुरळीत दिवस सुरु झाले, पँडेमिक नंतर, कि नक्कीच मी पण पत्ते खेळण्यासाठी क्लब तरी जॉईन करेन किंवा स्वतःचा ग्रुप सुरु करेन. लवकरच. 

Life cycle of "playing cards" in my life, with games using cards and various card games too.

छुटुकले - नेहेमीचे - बंगला - उनो - ऍडव्हान्स उनो - स्कीपबो - सिकवेन्स - फेज १० - इंडलेस लिस्ट.  

रमी - पेशन्स - ५ ३ २ - सत्ती लावणी - ७ ८ - ब्लॅक क्विन - झब्बू - गुलामचोर - ब्लफ - भिकार सावकार - इंडलेस लिस्ट 

परवाच मुलांशी उनो खेळतांना माझ्या प्रकर्षाने हे लक्षात आलं कि अनेक वेळा माझ्या सारख्या विनर पेर्सोनालिटी ला किती वेळा "ड्रा-४" "रिव्हर्स" "ड्रा-२" ई. पत्त्यांमुळे हातात मावणार नाही एवढे पत्ते उचलावे लागले, पनिशमेंट मिळाली. पण तरीही मी खेळत राहिले, अजूनही अनेकदा जिंकले आणि हारले देखील.  "ड्रा-४" वर "ड्रा-४" वर "ड्रा-४" आणि हातात ते चुकवण्यासाठी आवश्यक जर पत्ते नसतील तर मुकाट्याने घेतोच ना आपण, आणि मी घेतले, आणि ते फार शिताफीने वापरून जिंकले देखील. मजा आली. ह्यालाच कदाचित जगणं म्हणतात, नाही का. सुंदर मॅपिंग आढळलं मला ह्या पत्त्याच्या डावात आणि आपल्या जगण्यात.

Furniture & Room Items Miniature Poker Mini 1:12 Dollhouse Playing Cards  Doll House Mini Poker 1set woodland-resort.comwoodlandresort.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...