बुधवार, १९ मे, २०२१

एकदा बघावं आणि निरंतर ऐकावं असं...


"
आज सोनियाचा दिनू..." असं काहीस झालं होत मला. अवर्णनीय अश्या काही गोष्टी घडल्या, छोट्याशाच, पण आनंद देऊन गेल्यात. त्यातलीच एक म्हणजे: कचेरीतून येतांना वातानुकूलित गाडीतनं आले, माझ्या काही उत्साही तरुण मैत्रिणी बरोबर. त्यांच्या सोबत येणं म्हणजे दर वेळी एक वेगळीच पर्वणी असते, सगळ्याच इंद्रियांना, कधी चविष्ट पदार्थ असतात, तर कधी खुसखुशीत मस्ती / हशा / गप्पा / गाणी (मलाही तरुण झाल्यासारखं वाटतं) आणि आज तर होती महा-पर्वणी, ती म्हणजे आदरणीय लता दीदींचं नवं गाणं. संपूर्ण गाणं ऐकल्यावर काटेच आले अंगावर. ह्या वयात इतकं अप्रतिम गाणं म्हणणं म्हणजे ... मला शब्दच अपुरे आहेत. घरी आल्यावर पट्टाकिनी शोधलं यू ट्यूब वर आणि मग काय म्हटलं लिहावं. नक्कीच एकदा बघावं आणि अनेकदा ऐकावं, प्रशंसा करावी असंच....

वैष्णवी सायली तुम्हा दोघींचे खूप मनापासून धन्यवाद...

https://www.youtube.com/watch?v=KIzEiIvi6kw

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...