काल
अश्या अप्रतिम शीर्षकाचा लेख
वाचला वर्तमानपत्रात, शीर्षकच इतकं आवडलं कि नंतर लक्ष चित्राकडे गेलं. बघितलं तर एक छोटा मुलगा असेल ५-६ वीत, अगदी शहाण्या मुलासारखा शाळेचा गणवेश घालून संगणकासमोर बसला होता वर्ग ऐकत. कित्ती गोड दृश्य होत ते. शाळेची घंटा घरी वाजवण्याशिवाय पर्यायच नाही आहे सध्या आणि हा फारच अप्रतिम उपाय आहे, वर्ग, शिक्षण, परीक्षा, अभ्यास, व्यायाम सगळं म्हणजे सगळं व्यवस्थित सुरु आहे ऑनलाईन. हा, कधी कधी इंटरनेट चा त्रास होतो पण हरकत नाही. नंतर बघण्यासारखे असंख्य व्हिडीओ आहेतच कि. आणि हो ज्यांच्या गावी इंटरनेट ची सुविधा नाही त्यांना देखील हेच विडिओ वर्ग दूरदर्शन वर, आकाशवाणी केंद्रावर आणि अश्या अनेक माध्यमातून ऐकवले जात आहेतच. धन्य ते शिक्षकगण आणि बाकी सर्व लोक जे हे शिक्षणाचे काम नव्या पद्धतीने आणि जोमाने करत आहेत, विद्यार्थी देखील ह्याचा मनसोक्त आनंद उपभोगत आहेतच. उपवाद प्रत्येक जागी, स्थळी आणि स्वभावात असतातच. पण असो.
कंबर कसून सगळे संगणक क्षेत्रातले दिग्गज सरसावले आहेत आणि
संपूर्ण वर्ग सुरु-ते-संपेस्तोवर हजेरी घेणे, जर एखादा विद्यार्थी चा इंटरनेट संपर्क कितीदा बंद झाला, अधेमधे विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तर कोण कितीदा देतंय आणि बरेच काही व्यवस्थित टिपलं जातंय. विडिओ किती वाजता बघता येईल, किती वाजेपर्यंतच बघता येईल, परीक्षा किती वाजता सुरु होईल, अचूक पणे कधी संपेल, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर बरोबर आहे का नाही, गूण किती मिळाले सगळं च्या सगळं संगणक करून देत आहे.
अशा
पद्धतीने घरीच घंटा वाजण्याची हि पहिलीच वेळ आहे. ह्या नवीन संकल्पनेमुळे शिक्षण घराघरात पोचेल, साक्षरता आणि संगणक क्षेत्रा विषयीची उपयुक्तता सर्वांना कळेल अशी आशा करते.
रविवार, १६ मे, २०२१
शाळेची घंटा वाजली घरात...
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा