बुधवार, २ जून, २०२१

कानातल्याची फिरकी...

अगदी रोजनिशीतल लहानपणीच असं काम म्हणजे माझ्या आईच्या कानातल्याची जमिनीवर पडलेली फिरकी शोधणे. हे राम. मोठं काम असायचं ते. असंख्य प्रश्न (कशी पडली, कुठे पडली, बसून का नाही घालत, अशी कशी रोज़च पडते .), टॉर्च, झाडू.... देवा, काय काय लागायचं शोधायला. वेगळाच अनुभव होता तो.

अगदी झेरॉक्स माझ्या सासूबाईच पण बर का, कुठे पडायची ती फिरकी, देवा.

नंतर नंतर माझे कान तीक्ष्ण झाले होते, आणि माझं लक्ष असायचं आईच्या वेळेकडे आणि त्यामुळे थोडं सोप्पं झालं होत फिरकी शोधणं. आमच्या सोनाराने देखील एक शक्कल लढवली होती, तो हि नवीन कानातल्या बरोबर दोन-चार जास्तीच्या फिरक्या द्यायचाच.

मग आली माझी बारी, मी हि त्याच पठडीतली, बऱ्याच वेळी माझीही फिरकी (कानातल्याची हो) शोधावी लागली आहे, सगळ्यांनाच.

आणि कानातली सोन्याची असल्यामुळे फिरकीही सोन्याचीच आणि किमतीही, शिवाय गैरसोय व्हायची ती वेगळीच.

सध्या मी विविध रंगी खोटी कानातली घालते आणि आज त्याची फिरकी पडली माझ्या हातून. यक्ष प्रश्न उभा राहिला माझ्या समोर कारण कुठे पडली हे ऐकूच आले नाही, त्यामुळे मागोवा घेता आला नाही आवाज वरून. त्यातच फरशी आणि फिरकीचा रंग एकच, कप्पाळ माझं, मग काय लवकर सापडणार आहे ती. आजकाल त्या पारदर्शक प्लास्टिक च्या / रबर च्या फिरक्या आल्यामुळे सोय झाली आहे, हलक्या असतात वगैरे, पण गैरसोय हि तितकीच हो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...