बुधवार, २ जून, २०२१

माहेरची एक आठवण...

माझ्या लहानपणी आम्ही रविनगर नागपूर ला राहत होतो आणि माझी शाळाही अगदी हाकेच्या अंतरावर होती. रविनगर च्या आसपास बरीच झाडे होती तेव्हा, किंबहुना माझ्या शाळेच्या नंतर छोटेखानी जंगलचं होत. त्यामुळे वानरं बरीच यायची. रोजचीच सवय झाली होती. चुकूनही जरासं दार उघड राहिलं स्वयंपाक घराचं कि झालच. बरोबर पोळ्यांचा स्टीलचा डब्बा पळवायचेच ती वानरं. आणि अगदी शिताफीने उघडून पोळ्या फस्त करून शिवाय वाकुल्या हि दाखवायचे. फारच हुशार जात. कसच कळायचं त्यांना कुणास ठाऊक कि कुठला नेमका डब्बा उचलायचा ते. आमच्या शाळेत नेलेल्या डब्ब्याचीही तीच गत.

खूपच गोड आणि असंख्य आठवणी आहेत माकडांच्या.

पोटाला छोटंसं पिल्लू घेऊन शिताफीने कस्से चढायचे छतावर, बापरे, सगळी कवेलू ची घर होती त्यावेळी. पिल्लाची हि कमाल आणि आईची त्याहूनच.

तर आज हे सगळं लिहिण्या मागचं कारणही खासच आहे बरं का मंडळी, अगदी माझ्या खास माहेरासारखं.
त्याच असं झालं कि मी सध्या सिम्बिओसिस आंतरराष्ट्रीय महाविद्यालयात कामाकरता आले आहे. पहिला दिवस तर गडबडीत स्थिर स्थावर होण्यातच गेला पण दुसऱ्या दिवशी अगदी सकाळी कचेरीत आल्या आल्या बऱ्याच वर्षांनी मला पुन्हा भल्या मोठ्या शेपटीचे वानर दिसले. अहाहा, का मी इतकी खुश झाले माझं मलाच उमगलं नाही. किती वेळ होता तो माझ्या डोळ्या समोर. काय काय गमती करत होता, अहाहा. भन्नाटच, औरच.

एक दिवस दर्शन देऊन गायबच झाला पठ्ठा. काल आणि आज कित्ती वाट बघितली त्याची पण अजून काही दृष्टी पंथात पडले नाहीत राव.

खरंच काय दिवस होते ते, बोका यायचा, मांजर हि, माकडं तर होतीच, बहुतेक रोज गाय पोळी खाऊन जायचीच, कुत्री, चिमण्या . विचारूच नका. वेगळंच विश्व होत ते. आणि आता त्या गोड आठवणी आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...