माझ्या कचेरीत एक माझे सहपाठी / सहकारी आहेत. आम्ही दोघे एका गटात काम करतो. आम्हाला दोघांना भेटायचं होत, चर्चा करायची होती. पण एका पाठोपाठ काम येत गेली आणि माझं काही त्यांना भेटणं झालच नाही. फोन हि केला पण फारच व्यस्त लागला बराच वेळ. म्हणून मीच माझ्या गतीने हळू हळू चालत गेले त्यांच्या कचेरीत. त्यांनी साहजिकच विचारलं काय चाललंय, भेटच होत नाही आहे? आणि हे संभाषण हिंदीत होत होतं. तर ते सर म्हणाले "क्या क्या चल रहा है आज कल?" आणि मी माझ्या उत्साही शैलीत आणि झकास हिंदीत उत्तर दिलं कि "पूछो नही सर, NAAC का काम चल राहा है, research कि मीटिंग चल रही है, documents बनाना चल रहा है, admissions का काम चल रहा है, .....
असं
म्हटल्यावर ते म्हणाले कि:
"सब कुछ चल रहा है पर आपके के पैर हि नही चल रहे है, क्या बात है मॅडम!!! आप इतनी सारी चीजे चला रही है... कैसे?"
असे
सहकारी असल्यामुळेच कदाचित मला
उत्साह येतोय काम
करायला आणि
दुखणं जाणवत नाही आहे.
On Sep 16th 2018, unfortunately or fortunately my legs stopped working, which gave me ample opportunities to write, to narrate my tiny experiences and to make a note that this can be called as an important experience. So this write up is a part of series actually. Thank you.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा