धूनSS बदल
के तो देखो...
हे इतक्यात रेडिओ वर आलेलं नवीन वादळ आहे, हि एक नवीन धून तयार केली आहे, संग्राम आणि टीम ने. आणि म्हटलंय / गायलंय पण छान, ठसक्यात, लै भारी.
काही दिवस झाले रोज
संग्राम आणि
विद्या बालन ला ऐकल्यावर वाटलं कि हे सगळ्यांच्याच आयुष्यच मर्म त्यांनी मांडलय एका छोट्याश्या ओळीत. अहाहा. म्हणजे जर एखाद काम आपल्याला हवं तस्स झालं नाही तर आपण मार्ग बदलतो आणि बदलतच राहतो जोवर मनासारखं घडत नाही तोवर. नाही का?. एखाद्या प्रियजनाला देखील कोणती गोष्ट सांगायची झाल्यास विविध पद्धती अवलंबतो. "बदल हाच सातत्याने होत असतो किंबहुना करायचा असतो"
"change is the only constant".
माझ्या सासूबाई नेहमी म्हणायच्या कि "स्वभावाला औषध
नसतं". पण मग एक मी जाहिरात बघितली वर्तमान पत्रात आणि त्यात एक नाटक होत. "स्वभावालाच औषध असत" आणि ते एकपात्री नाटक आहे आणि तेही नावाजलेल्या प्रसिद्ध डॉक्टर ने लिहिलेलं आणि सादरही केलेलं. मी बघितलं आहे ते नाटक. अप्रतिम आहे. "स्वभावालाच औषध असत" = "बदल, सतत नवीच धून वापरायची, नवीन सूर पकडायचा च... आणि बरच काही, नाही का?
माझ्या शिक्षण क्षेत्रात हि तेच आहे, एखादी नवीन संकल्पना जेव्हा मी शिकवते, त्यावेळी ३-४ पद्धती तयार ठेवतेच. बदल करून शिकवलं कि वर्गात तजेला टिकून राहतो, विद्यार्थाना देखील आवडत / रुचत / पटत / समजत / लक्षात राहतं....
माझ्या घरच्या मुलांकडून काम
करवून घ्यायचं म्हणजे हि सतत विविध क्लुप्त्या वापराव्या लागतात. घरी काम करणाऱ्या बायका ची हि तीच तऱ्हा. सतत नवीन खाद्य शोधावंच लागत.
संग्राम आणि
ज्याला कोणाला हि टॅग लाईन सुचली त्याला सलाम....
गुरुवार, ३ जून, २०२१
Change (in self) is the only constant
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा